Aryan Khan Drugs case
Aryan Khan Drugs case Sarkarnama
मुंबई

शाहरूखची मॅनेजर, डिसूझा आणि गोसावी यांच्यात त्या दिवशी फोनवरून संपर्क झाल्याचे उघड

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आर्यन खानप्रकरणी आता एक नवी माहिती समोर आली आहे. आर्यनला अटक झाल्याच्या दिवशी शाहरूख खान याची मॅनेजर पूजा ददलानी ही सॅम डिसूझा आणि किरण गोसावीच्या फोनवरून संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. ता. २ ऑक्टोबरच्या रात्री आणि ३ ऑक्टोबरच्या सकाळी या तिघांमध्ये बोलणे झाल्याचे एसआयटीच्या तपासात पुढे आले आहे. (Aryan Khan case: Phone calls of Shah Rukh's manager, Sam D'Souza and Gosavi revealed)

मुंबई पोलिसांची एसआयटी आणि एनसीबी दोन्ही संस्था क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासादरम्यान एसआयटीने किरण गोसावी, सॅम डिसूझा आणि शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानी यांचे कॉल रेकॉर्डस तपासले. यात ज्या दिवशी आर्यन खानला अटक केली, त्या दिवशी हे तिघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. ता. ३ ऑक्टोबरला आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर म्हणजे २ ऑक्टोबरच्या रात्री आणि ३ ऑक्टोबरच्या सकाळी किरण गोसावी, सॅम डिसूझा आणि शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून अनेकदा बोलणे झाल्याचे समोर आले.

एनसीबीची एसआयटी सक्रिय

दररोज नवनवीन घडामोडी घडणाऱ्या आर्यन खान प्रकरणात एनसीबीच्या एसआयटीने स्टार किड्स आणि सेलिब्रिटींना समन्स बजावायला सुरुवात केली. आर्यन खान जामिनावर सुटल्यानंतर एनसीबीच्या एसआयटीने पुन्हा समन्स बजावले होते. पण, तब्येत बरी नसल्याने आर्यन येऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीलाही एनसीबीचे समन्स बजावले होते; पण तिनेही तब्येतीचे कारण सांगून यायचे टाळले. पूजा ददलानीसोबतच चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे यालाही समन्स बजावण्यात आले होते. त्याने कोरोनाचे कारण सांगत हजर होण्याचे टाळले. किरण गोसावी हा चिक्की पांडेच्या संपर्कात असल्याने त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आर्यन खानसोबत आरोपी असलेले अरबाज मर्चंट आणि अचित कुमार हे एसीबी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची काही वेळ चौकशीही करण्यात आली.

मुनमुन धामेचाचा न्यायालयात अर्ज

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना जामीन देताना कोर्टाने काही अटी घातल्या होत्या. त्यात दर मंगळवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची एक अट होती. यासाठी मी दिल्लीची रहिवासी असून मला दिल्ली एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज मुनमुन धामेचाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT