शरद पवार-वळसे पाटील- संजय राऊत यांच्यातील अचानक भेटीने राज्यात चर्चांना उधाण!

या तीनही नेत्यांच्या अचानक भेटीगाठी झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.
Sharad pawar-Dilip walse patil-sanjay Raut
Sharad pawar-Dilip walse patil-sanjay RautSarkarnama

मुंबई : राज्यात एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आज (ता. ९ नोव्हेंबर) ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात गाठीभेटी झाल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. (Home Minister Dilip Walse Patil and MP Sanjay Raut meet Sharad Pawar in Mumbai)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून रोज नवनवीन आरोप करत आहेत, त्याला भाजप आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रत्युत्तर देत आहेत. मलिक यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना फडणवीस यांनी आज त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Sharad pawar-Dilip walse patil-sanjay Raut
माजी आमदार कदमांचे सुपुत्र नगरपालिकेऐवजी झेडपीतून सुरू करणार राजकीय इनिंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील भेटीगाठीनंतर मंगळवारी दिवसभर राजकीय क्षेत्रात चर्चांना सुरवात झाली. मात्र, खासदार राऊत यांच्या मुलीची लग्नपत्रिका देण्यासाठी पवार यांच्या घरी गेल्याचे सांगण्यात आले; तर गृहखात्याबाबतच्या विषयांवर पवार आणि वळसे-पाटील यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या तीनही नेत्यांच्या अचानक भेटीगाठी झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

Sharad pawar-Dilip walse patil-sanjay Raut
शिवसेनेच्या भास्कर जाधवांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घरी जाऊन घेतली भेट

राऊत यांनी पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन सकाळी भेट घेतली. त्यावरून तर्कविर्तक लढविले जात असतानाच पवार, वळसे पाटील यांच्यामध्येही बैठक झाली. तिला मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हेही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, क्रझ ड्रग्ज प्रकारण, राजकीय आरोप-प्रत्यारोपातून पुढे येणारी नावे, मुंबईतील अमली पदार्थांची विक्री यासह काही राजकीय नेत्यांवरील कारवायांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बैठकीतील नेमका तपशील समजू शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com