Aryan Khan Case Update : Sarkarnama
मुंबई

Aryan Khan Case Update : कॉर्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणी मोठी अपडेट समोर; 'न्यायदंडाधिकारी नशेत..?'

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : कॉर्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणी (Cordelia Cruise Drug Case) एक मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणी एनसीबीकडून ज्यावेळी कारवाई करण्यात आली, तेव्हा तेव्हा त्या क्रूजवर एक न्यायदंडाधिकारी उपस्थित होते, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे. सीबीआयकडे तक्रार करूनही ते दाद देत नसल्याने, तिरोडकरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Latest Marathi News)

सीबीआयने तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्यावर कॉर्डेलिया ड्रग प्रकरणाच्या कारवाई संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये साक्ष नोंदवण्याची मागणी याचिकेतून केली जात आहे. आर्यन खानला अटक झालेल्या कॉर्डेलिया क्रूजवर एका न्यायदंडाधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र त्या दंडाधिकाऱ्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा, आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे.

कॉर्डेलिया क्रूजवरती दंडाधिकारी नशेत होते, त्यांना यातून थेट रूग्णालयात नेण्यात आलं, असेही तिरोडकर म्हणतात. दरम्यान याचिकेच्या वैधतेवर सवाल उपस्थित करत, या याचिकाकर्त्यांकडून एखाद्या प्रतिज्ञापत्राची मागणी केली जात आहे. शिवाय न्यायालयानेही याची दखल घेत, न्यायव्यवस्थेवर होत असलेल्या गंभीर आरोपांमागे आधार काय हा सवाल उपस्थित केला. तूर्तास या याचिकेवरची सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. मात्र सीबीआयने या प्रकरणी लक्ष घालण्याचे तोंडी निर्देश न्यायालयाने दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT