Aryan Khan Case : आर्यनला अटक केल्यानंतर वानखेडे-शाहरूख यांच्यातलं WhatsApp चॅटींग आलं समोर..

Aryan Khan Case WhatsApp Chat : एक बाप म्हणून मी तुला विनवणी करतोय...
Aryan Khan Case :
Aryan Khan Case : Sar

Aryan Khan Case WhatsApp Chat : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

Aryan Khan Case :
Aryan Khan Case: मुंबईत चार फ्लॅट, महागडी घड्याळं, सहा विदेश दौरे, खर्च फक्त साडेआठ लाख; वानखेडेंबाबत धक्कादायक खुलासे..

न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सीबीआयला वानखेडे यांचा जबाब नोंदविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याचबरोबर वानखेडेंनाही सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान यावेळी वानखेडे यांचे वकील रिझवान मर्चंट (Rizwan Merchant) यांनी म्हंटले आहे की, "आम्ही अटकपूर्व जामीन नाही मागणार, कारण हा पूर्ण बनाव आहे.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकर, खोट्या आरोपाचे शिंतोडे उडविले जात आहेत. समीर वानखेडे हे डेकोरेटिव्ह IRS अधिकारी आहेत. अत्यंत चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला, खच्चीकरण केले जात आहे. "

दरम्यान, आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्या दरम्यान समीर वानखेडे आणि शाहरूख खान (Shahrukh Khan) यांच्यातला व्हॉट्स अॅपवरील संवाद समोर आले आहे. दोघांमधील व्हाट्स अॅपसंवाद पुढीलप्रमाणे-

शाहरुख खान समीर वानखेडे व्हाट्सअप संभाषण -

Aryan Khan Case :
Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil: राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीस काय मार्ग काढणार ?

शाहरुख -

"ही घटना आर्यनच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. या देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणांची गरज आहे. तुम्ही आणि मी आपण हे केले आहे आता पुढील पिढीने याचे पालन केले पाहिजे. ते भविष्यासाठी तयार करणे आपल्या हातात आहे. तुमच्या दयाळूपणाबद्दल आणि समर्थनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. प्रेम srk

वानखेडे -

माझ्या शुभेच्छा

शाहरुख -

धन्यवाद. तू चांगला माणूस आहेस. आज मी विनंती करतो की त्याच्यावर कृपा करा. प्रेम srk

वानखेडे -

नक्की, काळजी करू नकोस

शाहरुख -

देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही सांगाल तेव्हा मी वैयक्तिकरित्या यायला तयार आहे आणि मी तुम्हाला मिठीही मारेल. कृपया तुमच्या सोयीनुसार वेळ कळवा.

शाहरुख खान -

कायद्याच्या सीमा असतात. मी तुम्हाला विनवणी करतो, कृपया त्याला त्या तुरुंगात राहू देऊ नका. तो माणूस म्हणून कोलमडून पडेल. काही स्वार्थी लोकांमुळे त्याचा आत्मा नष्ट होईल. तुम्ही मला वचन दिले होते. माझ्या मुलाला अशा ठिकाणी ठेवणार नाही, जिथे तो कोलमडून बाहेर येईल. यात त्याचा काही दोष नाही, काही स्वार्थी लोक ते करत आहेत. एक चांगला माणूस म्हणून तुम्ही अशा लोकांना साथ देऊ नका. मी तुम्हाला वचन देतो की मी काहीही करायला तयार आहे. त्यांना काहीही देण्यास तयार आहे. पण कृपया माझ्या मुलाला घरी पाठवा. तुम्हाला हे देखील माहित आहे की, तुमच्या हृदय त्याच्यासाठी खूप कठोर झाले आहे. कृपा करून एक बाप म्हणून विनवणी करतो.

वानखेडे - शाहरुख मी तुला एक चांगला माणूस म्हणून ओळखतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com