Mumbai News : 'आयसिस' या दहशतवादी संघटनेसोबत काम करत असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या झुबैर नूर मोहम्मद शेख आणि झुल्फिकार अली बरोदावाला यांच्या 'एनआयए' कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्या दोघांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत होणार आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळताच दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) ने ताबा मागितला आहे. आता त्यांना 'एटीएस'च्या ताब्यात देणार का, याकडे लक्ष लागले आहे. (Latest Political News)
झुबैर नूर मोहम्मद शेख आणि झुल्फिकार अली बरोदावाला यांच्यावर 'आयसिस'च्या महाराष्ट्र 'मॉड्यूल'शी जोडले असल्याचा आरोप आहे. 'एनआयए'ने २८ जूनपासून हाती घेतलेल्या कारवाईत मुंबई, पुणे ठाण्यातून काही आरोपींना अटक करण्यात आली होती. यात तबीश नासर सिद्दिकी (मुंबई), झुबैर नूर मोहम्मद शेख (पुणे), शार्जील शेख आणि झुल्फीकार अली बरोदावाला (ठाणे), अदनान सरकार यांचा समावेश आहे. यातील झुबैर नूर मोहम्मद शेख, झुल्फीकार अली बरोदावाला यांच्या 'एनआयए'च्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली होती. ती न्यायालयाने फेटाळली आहे. (Pune News)
'एनआयए'च्या तपासानुसार सरकार देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा आणि 'आयसीस'च्या कटाचा एक भाग म्हणून भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करत होता. आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी तरुणांची भरती करून त्यांना आयईडी आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या माहितीनंतर एनआयएचे छापे टाकले आहेत. 'एनआय'च्या तपासानुसार एजन्सीने सांगितले की ते महाराष्ट्र 'आयसिस मॉड्यूल' प्रकरणाचा तपास सुरू ठेवतील.
आरोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' (डीआयवाय) यासह सामग्रीही सामायिक केली होती. 'आयईडी' तयार करणे आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी तयार करणे समाविष्ट होते. दहशतवाद आणि हिंसाचाराच्या प्रतिबंधित संघटनांच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी 'व्हॉईस ऑफ हिंद' मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री प्रकाशित करण्यात आली होती, असे दहशतवादविरोधी तपास संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.