Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

हिवाळी अधिवेशनात शिंदे - फडणवीस सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादीची तब्बल ८०० पदाधिकाऱ्यांची बैठक

Winter sessions News : शिंदे - फडणवीस सरकारला विरोधक घेरणार?

सरकारनामा ब्यूरो

Winter sessions News : नागपूरमध्ये (Nagpur) १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे - फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य, राज्याबाहेर गेलेले उद्योग, शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अनेक विषयांवर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress) तब्बल ८०० पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकरी मोर्चाला अंतिम रूप देण्यात येणार असल्याचं एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये शिंदे - फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधक तयारी करत आहेत का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात शेतकरी मोर्चा नागपूरला (Nagpur) काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या (NCP) ८०० पेक्षा जास्त जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी ६ डिसेंबरला मुंबईत (Mumbai) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पूर्ण दिवसाचा कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांच्या दिंडीच्या आयोजनाबाबत विचार विनिमय करण्यात येणार असल्याचं एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे.

दरम्यान, सध्या शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) मिळताना येणाऱ्या अडचणी, बेरोजगारी, महागाई, राज्याबाहेर गेलेले उद्योग या प्रश्नावरून अधिवेशनामध्ये शिंदे -फडणवीस सरकारला विरोधक घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आता याचा सामना कसं करतं? हे हिवाळी अधिवेशनादरम्यानच (Winter sessions) पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT