Nitin Gadkari : 'हे फक्त गडकरीच करू शकतात...'

'काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी सांगितलं...'
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Nitin Gadkari News : ''हे फक्त गडकरीच करू शकतात'', असं म्हणत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच तोंडभरून कौतुक केलंय. नाना पाटेकर हे खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२२ या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी नागपूरमध्ये बोलत होते. त्यामळे नाना पाटेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमाला नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. नाना पाटेकर म्हणाले, ''मी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमाला उशिरा येण्याचं कारण म्हणजे रणजीत देशमुख यांच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. त्यामुळे या कार्यक्रमाला यायला उशीर झाला''.

''काँग्रेसचा (Congress) नेता असूनही नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं. नितीन गडकरींनी तो नेता काँग्रेसचा आहे पण ती चांगली माणसं आहेत नाना तुम्ही तिथं जा, असं सांगितलं. पण हे फक्त गडकरीच करू शकतात'', असं म्हणत नाना पाटेकरांनी गडकरींच तोंड भरून कौतूक केलं.

Nitin Gadkari
Ajay Ashar : मुख्यमंत्री शिंदेंच्या हट्टामुळे भाजपची अडचण? अजय आशर नियुक्तीचा वाद...

''तसेच तो कार्यक्रम करून या. थोडा उशीर झाला तरी चालेल, असं सांगितलं. खरं तर आनंदाची व्याख्या माणसागणिक बदलते. पण इतक्या हिरिरीने विचार करणारा माणूस म्हणजे नितीन गडकरी आहेत. गडकरींनी सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमाची ताकद ओळखली आहे. सांस्कृतिक महोत्सव हे माध्यम फक्त करमणूक नाही. तर इथं सगळ्या जाती-धर्माची माणसं एकत्र येतात. हाही एक सुक्ष्म राजकारणाचाच भाग आहे'', असं मत नाना पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये अनेक मुद्यांवर भाष्य केलं. याबरोबरच त्यांनी नितीन गडकरी यांच तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com