Shivsena and BJP
Shivsena and BJP sarkarnama
मुंबई

भाजप तीन राज्यांत जिंकताच महाराष्ट्रातील नेत्यांनी शिवसेनेला डिवचले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून त्यापैकी चार राज्यात भाजप आघाडीवर असल्याने महाराष्ट्रातील भाजप आमदारांनी विधानभवनात घोषणाबाजी केली. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात भाजपच्या नेत्यांशी सरकारनामाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी बातचीत केली आहे.

डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, ''हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि अर्थातच विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज देश प्रगती करत आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले त्याचा महाराष्ट्रातील अत्यंत अनोखा सोहळा डोंबिवलीत आज दुपारी अप्पा दातार चौक येथे आज दुपारी चार वाजता गणेश मंदिर पथ येथे जल्लोषात साजरा होणार आहे.

अयोध्येचा राजा श्रीरामचंद्राच्या जन्मभूमी मंदिराचं प्रतीक "याची देही याची डोळा" आपल्याला पाहायला मिळेल.'' माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, देशातल्या जनतेने पुन्हा एकदा मोदी़ंवर विश्वास दाखवला आहे. महाराष्ट्रात ही महायुतीच्या बाजून कौल दिला होता. पण, सोबत असलेल्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पंजाबमध्ये मतांची टक्केवारी वाढली आहे.

सरकारने एसटीबाबत निर्णय आता घ्यावा. परिवहन मंत्री एसटीबाबत आज निवेदन देतील काल एसटी कमिटीशसोबत झालेल्या बैठकित सकारात्मक चर्चा झाली. मात्र, तीन तिघाडी काम बिघाडी ही सरकारची परिस्थिती आहे. पण आमचा विलनीकरणाचा लढा न्यायालयात सुरूच राहिल.माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, 121 जागांचे निकाल भाजपच्या बाजूने आहेत. देश भाजप मय होत आहे.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातही बदल होईल. सरकारी वकील श्री. चव्हाण यांनी समोर यावे. आम्ही व्हिडिओ प्रकरणी CBI ची मागणी करत आहोत. CCTV आहे मग रिकॉर्डिंग कुठून झाली, असे कोण कसे बोलू शकेल.दूध का दूध पाणी का पाणी म्हणतात मग करा चौकशी असे स्पष्ट करून ते म्हणाले, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले, उत्तरप्रदेश, गोव्यात शिवसेनेचं सरकार येईल असे राऊत म्हणत होते. मात्र, त्यांनी आधी महाराष्ट्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. उद्या म्हणतील दिल्लीत आमचं सरकार येईल उगाच काहीही बरळू नये. देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यासहीत आरोप केलेत. गृहमंत्री यांनीही पुरावे देऊन उत्तर दयावेत अशी अपेक्षा आहे. उगाच संजय राऊत याच्या प्रमाणे हवेत बोलू नये.

माजी मंत्री सुधीर मुनंगटीवार म्हणाले, विजय झाला तरी माजायचं नाही आणि पराभव झाला तरी लाजायचं नाही हे आमचं धोरण आहे. खुर्ची, जातीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही. चारही राज्यात भाजप वेगाने चांगलं काम करेल, महाराष्ट्रात शब्दासाठी जागणारे हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचं सरकारला कौलदिला होता. मात्र, कुणीतरी विश्वास घात केला, असा प्रश्न त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना केला. भाजपच्या जागा येत नाहीत, अशी मत अनेका़ंनी व्यक्त केली. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली कोणताही निकाल हा पुढच्या निवडणुकीची नांदी नसते. भाजपला संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांचे डिपोझिट जप्त झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT