Kirit Somaiya -Shivsena Crises news  Sarkarnama
मुंबई

शिंदे गटाचे आमदार आक्रमक होताच सोमय्या झाले मवाळ; ठाकरेंच्या प्रश्नावर केली राऊतांवर टीका

Kirit Somaiya|Shivsena|Sanjay Raut : शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकरांनी आपण सोमय्यांची तक्रार फडणवीसांकडे करणार असल्याचे सांगितले होते.

सरकारनामा ब्यूरो

kirit Somiya : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळाली आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं असून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दरम्यान शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या 40 शिवसेनेच्या बंडखोर आमदार आणि भाजपच्या समर्थनाने राज्यात सरकार स्थापन केल आहे. मात्र आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत, असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून केला जात आहे. काही आमदारांकडून उद्धव ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केली जात असली तरी उघड टीका करणं टाळलं आहे. आम्ही वेगळा निर्णय घेतला असला तरी आजही आम्ही ठाकरेंना मानत असून त्यांच्याबाबत आदर असल्याची भूमिका बंडखोर आमदारांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे भाजप नेत्यांची चांगलीच कोंडी होत आहे.

नुकतीच ठाकरे यांच्यावर टीका केलेले भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना बंडखोर आमदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. याबाबत शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकरांनी याबाबत आपण फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. यामुळे सोमय्या चांगलेच मवाळ झाले असून ते आता ठाकरेंवर टीका करणं टाळत असून राऊतांवरच टीका करतांना दिसत आहेत.

मुंबईत आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सोमय्यांनी ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ठाकरे यांच्यावर टीका न करता संजय राऊतांना टार्गेट केले. माध्यम प्रतिनिधींनी आजच्या निकालावर लोकशाहीची दिशा ठरेल, असे ठाकरे म्हणतात, याबाबत तुम्हाला काय वाटतं?, असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी ठाकरेंवर टीका न करता राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मला हे समजत नाही की, 2019 मध्ये ज्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाने मते मागितली, ते राऊत आता विश्वासघाताची भाषा करत आहेत, याचं मला हसायला येत, असे भलतेच उत्तर सोमय्यांनी दिलं. यामुळे सोमय्यांना फडणवीसांचा निरोप पोचल्याची चर्चा रंगायला सुरवात झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी सोमय्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आणि याबाबतची माहिती ट्विटवरून देत असतांना उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली होती. ते ट्विटमध्ये म्हणाले होते की, "मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबदल अभिनंदन केले," अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली होती. मात्र, या टीकेवर शिंदे गटाच्या आमदारांनी याबाबत नाराजी व्यक्त करत, अशी टीका खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हटलं होते. यामुळे सोमय्यांनी आपल्या टीकेचा मोर्चा आता राऊतांकडे वळवल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT