Asaduddin Owaisi : sarkarnama
मुंबई

Asaduddin Owaisi : उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा नाही ; नामांतरामुळे ओवेसींचा नाराजीचा सूर?

Asaduddin Owaisi : प्रत्येक राज्यात आमचा एक तरी आमदार निवडून येणार..

सरकारनामा ब्यूरो

Asaduddin Owaisi : एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उद्धव ठाकरेंबद्दल भाष्य केले. 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची प्रादेशिक पक्षांची रणनीती असली तरी मला शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. ठाणे शहरात एमआयएमच्या पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (25 फेब्रुवारी) त्यांनी ही माहिती दिली. हे दोन दिवसीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

'मी अल्लाहच्या कर्मामुळे उभा आहे'

अल्लाहच्या कार्यामुळे मी उभा आहे आणि संविधानावर आमचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. एआयएमआयएमच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान त्यांनी मुस्लिम आणि दलितांबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, "आज मुस्लिम आणि दलित खूप कमकुवत आहेत. मात्र यापुढील काळात भारतातील प्रत्येक राज्यात यांच्या पक्षाचा एक आमदार असेल, अशी आशा आहे.

मोदी सरकारवरही निशाणा साधला :

ओवेसी यांनी शनिवारीच मोदी सरकार तसेच दिल्लीतील आप सरकार आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर टीका केली. यासोबतच खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यावरूनही त्यांनी आप सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT