Pune By-Election : व्होटींग कार्ड नाही? टेंशन घेऊ नका, 'या' बारा कागदपत्रांपैकी एक पुरावा दाखवून करा मतदान !

Pune By-Election : विदेशातील मतदारांना पारपत्र दाखवून मतदान करता येणार
Pune By-Election :
Pune By-Election :Sarkarnama
Published on
Updated on

Pune By-Election : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी उद्या म्हणजेच रविवारी (२६ फेब्रुवारी) रोजी मतदान पार पडणार आहे. उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. मतदाराकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास, निवडणुक आयोगाने इतर बारा दस्तावेज हा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे. या बारापैकी एक पुरावा आणि मतदार यादीत नाव असल्यास नागरिकांना मतदान करता येणार आहे.

मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी छायाचित्रसहीत मतदार ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. मात्र मतदार ओळखपत्रावर छायाचित्र नसल्यास किंवा मतदार ओळखपत्र नसल्यास ओळख पटावी यासाठी खालील कागदपत्रे सादर करू शकतात.

१)आधार कार्ड

२)मनरेगा जॉबकार्ड

3)बँकांचे किंवा टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक

४) मंत्रालयाच्या योजनांच्या जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड,

५)वाहनचालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसेन्स,

६)पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधकद्वारा (आरजीआय) जारी केलेले स्मार्टकार्ड,

७) पासपोर्ट (पारपत्र),

८)छायाचित्र असलेला निवृत्तीवेतनाचा दस्तावेज,

९) राज्य किंवा केंद्र सरकार सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह ओळखपत्र

१०) खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेलं अधिकृत ओळखपत्र

११) केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातून जारी केलेले दिव्यांगत्वाचे ओळखत्र (युनिक डिसेबिलिटी आयडी)

हे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Pune By-Election :
Kasaba By-Election : उद्या मतदान, दोन लाखाहून अधिक मतदार, वाचा अशी आहे प्रशासनाची तयारी..

खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेलं अधिकृत ओळखपत्र आणि तर मतदार दिव्यांग असल्यास केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातून जारी केलेले दिव्यांगत्वाचे ओळखत्र (युनिक डिसेबिलिटी आयडी) हे ही ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असे आयोगाने सांगितले आहे.

Pune By-Election :
Pune By-Election : पोटनिवडणूक प्रचार बंदोबस्तातील हलगर्जीपणा अंगलट; 31 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

मतदार यादीत मतदाराची ओळख होत नसल्यास, किंवा काही तांत्रिक अडचीणी निर्माण झाल्यास, मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा वरील यादीतील १२ पैकी एक पुरावा दाखवून मतदान करता येऊ शकते, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे. विदेशातील मतदार केवळ ओळखीसाठी त्यांचा भारतीय पारपत्र म्हणजेच पासपोर्ट सादर करावा,असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com