Ashish Deshmukh Dismiss :
Ashish Deshmukh Dismiss : Sarkarnama
मुंबई

Ashish Deshmukh Dismiss : अखेर आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित; कारणे दाखवा नोटीस बजावली..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी काँग्रेस (Congress News) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आता त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavhan) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली . आता या समितीचा अहवाल समोर आले आहे.

आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आले आहे. तीन दिवसात या नोटीशीला उत्तर द्यावं, असं शिस्तपालन समितीनमे निर्देश दिले आहेत. उत्तर येईपर्यंत त्यांचं काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

'नाना पटोलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका मिळत असल्याचा दावा, आशिष देशमुख यांनी केला होता. आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर असे गंभीर आरोप केले होते. पटोले हे लवकरच गुवाहाटीला असतील, त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला १ खोका दिला जातो, असा खळबळजनक आरोप आशिष देशमुख यांनी केला होता.

देशमुख यांच्या या विधानावर कारवाई काँग्रेसच्या आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत होणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसची शिस्तपालन समितीची बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. काँग्रेस पक्षाच्या या बैठकीत उल्हास पवार, भालचंद्र मुणगेकर आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. अपेक्षेनुसार आता त्यांना कारणे दाखवा नोटीस दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT