Devendra Fadnavis, Ashish Selar &Nawab Malik Sarkarnama
मुंबई

फडणवीसांच्या बॉम्बची शेलारांनी दाखवली मलिकांंना भीती

अशिष शेलार (Ashish Selar) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून काही मंत्र्यांचे फुसके बार आपण ऐकले आहेत. दिवाळीनंतर जो बॉम्ब देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फोडणार तो फुटण्याआधीच या लोकांनी कसे कानावर हात ठेवले हे आजच्या पत्रकार परिषदेतून समोर आले आहे. अशी टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Selar) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर (Nawab Malik) केली आहे.

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणे हे भाजपचे काम नाही. मात्र, मुद्दाम विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, 200 मिलिग्राम ड्रग्स मिळाले तरी एनसीबीने (NCB) कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

शेलार म्हणाले, नवाब मलिक हे सर्वसाधारण माहिती देत आहेत. आज (ता.2 नोव्हेंबर) त्यांनी समीर वानखडे यांचे कपडे, बूट हे विषय काढले, तुमचा जावई आठ महिने अटकेत असताना ही माहिती होती, मग ती का लपवली? तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय? याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे. यासर्व लपवालपवीचा घटनाक्रम पाहता, मलिकांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या दोघांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबरोबरच जे मंत्री सरकारची ढाल पूढे करून पोलीस यंत्रणेसमोर जात नाही. कोर्टात जात नाही. त्यामुळे मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी. ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांना आणि ज्यांनी आरोप केले त्यांना समान न्याय राज्य सरकारने द्यायला हवा. नाहीतर सरकारचा या कटकारस्थानात सहभाग आहे. असा घणाघात शेलार यांनी केला आहे.

देशमुख यांची अटक राज्याच्या प्रतिमेला तडा देणारी

अनिल देशमुख जे सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम करत होते, त्यांना अटक करावी लागली हे राज्याच्या प्रतिमेला तडा देणारा प्रसंग आहे. पोलीस यंत्रणा 100 कोटी वसुली करण्यासाठी वापरली जाते, वाझेना संरक्षण देण्यासाठी पोलीस यंत्रणा वापरली जात आहे. सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचा उपद्व्याप आहे. इतके दिवस देशमुख यांनी कारवाईतून पळ काढणे हे अपेक्षित नव्हते. किमान पवार साहेबांचा तरी आदर्श ठेवायला हवा होता. पवार स्वतः म्हणाले होते मी ईडीची नोटीस येण्याआधी ईडी करालयात जातो. तो आदर्श तरी ठेवायला हवा होता. असा टोमणा देखील त्यांनी लगावला.

मलिकांनी त्यांचे नाव आता खयाली मलिक असे ठेवायला हवे

मलिक यांच्या आरोपांचा स्थर मीठी नदीच्याही खालचा आहे. मलिक यांनी आता त्यांचे नाव 'खयाली मलिक' असे ठेवायला हवे. मुंबईतील नेत्यांचे सीसीटीव्ही बाहेर आले तर, तुमची पळता भुई थोडी होईल. असा इशारा शेलारांनी मलिकांना दिला. तसेच, आयकर विभागाची कारवाई टप्याटप्याने सुरू आहे. राज्य सरकारची ही कारवाई नाही. याचे स्पष्टीकरण अजित पवार देतील आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देतील. तसेच, चौकशी सर्वांची झाली पाहिजे तपास यंत्रणांचे हे काम आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून कसे गेले याचे उत्तर मलिक यांनी आधी द्यायला हवे. असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय दलालांची दलाली मलिक करीत नाहीत ना?

ड्रग्सच्या विरोधात आपल्या देशातील युवकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकार एक मोठे युद्ध लढत आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्स डीलर्सना वाचवण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. केंद्राने केलेल्या आयटी ऍक्ट कायद्याला या लोकांनी विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय दलाल ज्यांना या कारवाया नको आहे त्यांची दलाली तर नवाब मलिक करत नाही ना? असा संशय निर्माण होत आहे. असा गंभीर आरोप त्यांनी केली आहे.

राऊत यांच्या पत्नी आमच्या वहिनी

संजय राऊत यांच्या पत्नी आमच्या वहिनी आहेत. आम्हाला कुणाच्याही पत्नी आणि मुलांबद्दल आक्षेप नाही. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला बदनाम करणे हा बदनामीचा कार्यक्रम राष्ट्रवादीने हाती घेतला आहे का? असा सवालही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT