Ashish Shelar, uddhav thackeray
Ashish Shelar, uddhav thackeray sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : काँग्रेस-राष्ट्रवादी-समाजवादी यांच्याशी युती केल्यानं ठाकरेंचा वैचारिक लोचा !

सरकारनामा ब्युरो

Ashish Shelar : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर निशाणा साधला आहे."राजकीय स्वार्थासाठी ठाकरे मतांची पेरणी करीत आहेत," असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

"विधानसभेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत मराठी आणि मुस्लिम मतं किती?, मराठी+मुस्लिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय कसा, या संदर्भातील गणिताचा प्रचार करू लागले आहेत. त्यामुळे हीच ती वेळ आहे. कारण हे गणित तुम्ही मुंबईकरांसमोर मांडत नाहीयेत. त्यामुळे आम्ही थेट त्यांच्यासमोर मांडणार आहोत. हा सर्व प्रयत्न मराठी मतांना भुलवणे आणि मुस्लिम मतांना फसवण्याचा आहे," असा आरोप शेलारांनी केला आहे.

आशिष शेलार म्हणाले, "सामनामध्ये २२ ऑक्टोबरला आपण सर्वांनी एक बातमी बघितली असेल किंवा वाचली असेल. अतिशय हुशारीने मुखपत्राच्या मुखपृष्ठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी मुस्लिमांचं समर्थन आणि काही लोकांचे फोटो अशी बातमी झळकली. कोणी कोणाला समर्थन द्यावे आणि घ्यावे तो त्यांच्यातल्या पक्षाचा प्रश्न आहे. खरंतरं स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मतांची पेरणी करण्याचा एक नवीन विचार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हळुवारपणे त्याठिकाणी मांडला आहे,"

आशिष शेलार म्हणाले..

  • जी शिवसेना तुम्ही पाहिली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने जातीपाती धर्माच्या विरहीत राजकारण करून मतांची बांधणी आणि आखणी केली. आज उद्धव ठाकरेंना जाती आणि धर्मांवर मतं मागण्याची वेळ का आली ही पेरणी करण्याची गरज का पडली.

  • उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोचा केला आहे. परंतु तुम्ही पोटनिवडणुकीत देखील गेलात आणि कम्युनिस्ट पक्षासोबत सुद्धा तुम्ही समर्थन मागितलं.

  • आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्यावर तुम्ही समाजाच्या विभागण्या का करताय?, धर्म-समाज आणि धर्म-जात याची पेरणी का करताय ?

  • ठाकरेंच्या विचारांमध्ये आणि समर्थनामध्ये लांगून चालनाचा एक स्वार्थीय वास आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूका जिंकण्यासाठी केलेली एक राजकीय पेरणी आहे.

  • मराठी आणि मुस्लिम पण राजकीय हुशारीमुळे आणि थेट बोलण्याची हिंमत नसल्यामुळे मराठी मुस्लिम असा शब्द वापरण्यात आला. ही भिती आम्ही का मांडत आहोत, कारण ही विचारधारा पसरवण्याचं काम त्यांच्या मित्रपरिवारांनी सुरू केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT