Ashish Shelar, Uddhav Tackeray Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : 'अभ्यंकर हे भयंकर आणि परब हे अरब; विधानपरिषदेत ठाकरे गटाकडून पैशाचा धुमाकूळ'

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राज्यात बुधवारी (ता. 26) विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर आणि भाजपचे शिवनाथ दराडे यांच्यासह पाच उमेदवार रिंगणात होते. तर मुंबईत पदवीधरसाठी ठाकरे गटाचे अनिल परब Anil Parab आणि भाजपचे किरण शेलार आमनेसामने होते.

या दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाने पैशाचा धुमाकूळ घातल्याचा आरोप भाजप नेते अशिष शेलार यांनी केला आहे. पैसे वाटपात 'अभ्यंकर हे भयंकर' ठरले तर पैशे वाटपात'परब हे अरब' असल्यासारखे वागत होते, असा टोलाही शेलारांनी लगावला आहे.

या निवडणुकीबाबत अशिष शेलारांनी Ashish Shelar ट्विट करून ठाकरे गटावर व्हिडिओच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. पण जाणून बुजून उल्लेख करतो की, उबाठा सेनेने पैशांचा धुमाकूळ मांडला होता. शिक्षकांच्यामधून उमेदवार असलेले अभ्यंकर हे जणू काही 'भयंकर' असल्यासारखे पैशे वाटप करत होते. पदवीधरातून उमेदवार असलेले परब जणू काही 'अरब' असल्यासारखे पैसे वाटण्याचे काम त्यांची लोकं करत होती, असा घणाघात शेलारांनी ठाकरे गटावर केला आहे.

या दोन्ही मतदारसंघात पैशांच्या जोरावर मतदारांना विकत घेता येते, या पद्धतीने उबाठा गटाकडून गोंधळ घातला होता. त्यांना अन्य काही उमेदवारांनी साथ दिली. मात्र भाजपचे शिक्षकचे उमेदवार शिवनाथ दराडे आणि पदवीधरचे किरण शेलार यांच्यासाठी आम्ही पूर्ण संघटनेची ताकद लावली. माझा मतदारांवर पूर्ण भरोसा आहे. आमचा विजय मतदार सुकर करतील, असा दावाही अशिष शेलारांनी केला.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या चारही मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघात 63 टक्के, मुंबई पदवीधरमध्ये 56, मुंबई शिक्षक मतदारसंघात 75 नाशिक शिक्षक मतदारसंघात 93.48 टक्के मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT