VIDEO : Dhananjay Munde News : शेतकऱ्याने बैल नसल्याने भाऊ अन् मुलाला कोळप्याला जुंपले; कृषिमंत्र्यांनी 48 तासांतच पाठवली बैलजोडी!

Dhananjay Munde sent a pair of bullocks to the farmer : शेतकऱ्यास कृषी विभागाकडे ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्यासही सांगितले आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

Agriculture minister Dhananjay Munde and Poor farmer News : पाचवीला पुजलेला दुष्काळ, कायम नापिकीचे संकट, कधी अवकाळी, गारपीटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला, अशा आस्मानी आणि सुलतानी संकटाला राज्यातला बळी राजा कायम तोंड देत असतो. अल्पभूधारक शेतकऱ्याची अवस्था तर अधिकच बिकट होत आहे.

एकर-दोन एकरमध्ये पेरणी करायची आणि त्यात उगवेल त्यावर संसाराचा गाडा हाकायचा, अशी तारेवरची कसरत हजारो शेतकरी करताना दिसतात. अनेकदा पेरणी, नांगरणीसाठी बैल नाही म्हणून कुटुंबातीलच कोणी तरी खांद्यावर जू घेऊन पेरणी करतो हे चित्रही अनेकदा समोर येते.

अशाच एका हिंगोली(Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्याने हळद लगावड करण्यासाठी बैल जोडी नसल्याने आपल्या भावाला आणि मुलाला जुंपून लागवड केल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी समोर आला.

Dhananjay Munde
MLA Babajani Durrani : शरद पवारांनी दिलेल्या आमदारकीची मुदत संपली, दुर्राणी यांचे पुनर्वसन अजित पवार करणार का ?

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी साम टीव्हीवर या संदर्भातील वृत्त पाहिले आणि 48 तासांत या शेतकऱ्याच्या बांधावर बैलजोडी पाठवली. बैलजोडी मिळाल्यानंतर या शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर समाधान होते. धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या फेसबुक पेजवर या संदर्भात माहिती दिली.

Dhananjay Munde
MLA Pradnya Satav News : आमदार प्रज्ञा सातव यांना काँग्रेस पुन्हा संधी देणार का ?

हिंगोली जिल्ह्यातील शिरळे ता.वसमत येथील शेतकरी बालाजी पुंडगे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शेतात हळद लावण्यापूर्वी सरी काढताना बैल उपलब्ध नसल्याने आपला भाऊ व मुलाला कोळप्याला जुंपलेला एक व्हीडिओ साम टिव्हीच्या माध्यमातून माझ्या पाहण्यात आला. हे चित्र पाहून मन उदास झाले होते. दोन एकर शेती असलेल्या बालाजी पुंडगे यांना आज माझ्यावतीने त्यांच्या शेतात बांधावर बैलजोडी भेट दिली आहे.

माझ्यावतीने माझे सहकारी बी.डी. बांगर यांनी बालाजी यांच्या शेतात बैलजोडी पोहोच केली. त्याचबरोबर त्यांना कृषी विभागाकडे ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्यासही सांगितले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या व्यथा, निसर्गाची अवकृपा या सगळ्या चक्रात हे सरकार सर्वार्थाने शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी या निमित्ताने दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com