Uddhav Thackeray, Ashish Shelar, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : ठाकरे गटानं आता नॅनो बुक करावी; आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

Avinash Chandane

Mumbai Political News :

भाजप आमदार आणि भाजपचे मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला आणि नेत्यांना डिवचलं आहे. तुमचा थयथयाट म्हणजे अखेरची घरघर, अशी टीका करतानाच तुमच्या गटासाठी आता नॅनो बुक करा, असा सल्लाही शेलारांनी दिला आहे.

आशिष शेलार यांनी X या सोशल मीडियावर ट्विट करत टीका केली आहे. त्यात त्यांनी संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे.

'ही तर तुमची अखेरची घरघर!' या शीर्षकाखाली लिहिताना 'पक्ष गेला, चिन्ह गेले, खासदार, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक गेले... जो शिल्लक गट दिसतोय ते घेऊन पत्रकार पोपटलाल जो थयथयाट करीत आहेत, तो म्हणजे त्यांच्या गटाची अखेरची घरघर!' अशी टीका शेलारांनी (Ashish Shelar) केली आहे.

अनेक नेते, नगरसेवकांनी ठाकरे गटाला' जय महाराष्ट्र' केल्यामुळे त्यांचं बळ कमी झालं आहे. याचा 'गट केवढा, आणि आवाज केवढा? पण, अखेरच्या घरघरीचा आवाज मोठाच असतो म्हणा!' या शब्दांत शेलारांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackery) समाचार घेतला आहे. त्याचवेळी '2024 नंतर महाराष्ट्रात भाजप कुठे असेल? याची चिंता तुम्ही करू नका! छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपच आणि तुमच्या पक्षासारख्या बांडगुळांना दिल्ली दाखवली तीसुद्धा भाजपनेच!' (BJP) अशी कडवट टीका शेलारांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शेलारांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) चांगलंच लक्ष्य केलं आहे. सुरुवातीला 'पत्रकार पोपटलाल' असा राऊतांचा उल्लेख केला आहे. त्यानंतर 'तुमचा सडकून पराभव अटळ आहे. तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार हे निश्चित आहे. "हग्रलेख" आजच लिहून ठेवा!' अशी टीका शेलारांनी केला आहे.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा आकार खूप लहान झाला आहे. यावरून उद्धव ठाकरेंना आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. 'तुम्ही तुमच्या गटासाठी नॅनो गाडी तेवढी बुक करून ठेवा!!' या शब्दांत आशिष शेलार यांनी शालजोडीतून ठाकरेंना डिवचलं आहे. शेलारांच्या टीकेला ठाकरे गटानं अजून प्रत्युत्तर दिलेलं नाही.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT