Manoj Jarange : 'सागर'वर जाण्याचा निर्धार, पण पुन्हा अंतरवालीत परतले जरांगे-पाटील; फडणवीसांना इशारा देत म्हणाले...

Manoj Jarange Patil On Eknath Shinde : "मराठ्यांना आरक्षण फक्त एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात, असं प्रत्येकवेळी बोललो आहे. पण...", असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी मुंबईतील 'सागर' बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला होता. यानंतर परिसरातील आणि राज्यातील मराठा बांधवांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं. मराठा आंदोलक जमण्याची शक्यता असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू केले. त्यामुळे भांबेडी येथून जरांगे-पाटलांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. ( Manoj Jarange Patil Latest News )

Manoj Jarange
Manoj Jarange Patil : "तुम्ही असाल दादा, पण...", मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावर जरांगे-पाटलांचं प्रत्युत्तर

आता सायंकाळी 5 वाजता पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगे-पाटलांनी सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. "सायंकाळी 5 वाजता आमरण उपोषणाबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे. राज्यातील साखळी उपोषण आणि धरणं आंदोलन शांततेत सुरू ठेवायची आहेत. तसेच, सुरू असलेली आमरण उपोषण थांबवण्यात यावे," असं आवाहन जरांगे-पाटलांनी केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मी 'सागर' बंगल्याकडे निघालो होतो. पण, त्यांनी ( देवेंद्र फडणवीस ) हार पत्करली आहे. पोलिसांच्या माध्यमातून रस्ते अडवण्यात आले आहेत. अंतरवाली येथे पुन्हा शांततेत आमरण उपोषण सुरू आहे. न्यायालयाचा मान ठेवून सलाइनही सुरू आहे. फडणवीस म्हणतील तसं नाही, तर पोलिस म्हणतील तसं सगळं सुरू आहे," असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil : "फडणवीसांना सुट्टी नाही अन् आणखी...", जरांगे-पाटलांचा थेट इशारा

"मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेची नाराजी ओढावून घेऊ नये. अधिवेशनात सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी, गुन्हे मागे घेण्यात यावे, हैदराबादचे गॅझेट घ्यावे. तुम्ही कितीही दबाव आणला, तरी मी या मागणीपासून तसूभरही हटणार नाही," असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला.

Manoj Jarange
Nitesh Rane Vs Jarange : "...तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", राणेंचा जरांगे-पाटलांना थेट इशारा

"मराठ्यांना आरक्षण फक्त एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात, असं प्रत्येकवेळी बोललो आहे. पण, मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांचं ऐकून विधान बदलत असतील, तर मग काय करावं? आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करणार? लोक उचलणार? हे मुख्यमंत्र्यांना कुठं शोभतं. पूर्वी अंतरवालीत घडलं, ती चूक पुन्हा करू नका. सोळा ते सतरा हजार पोलिस उभे केल्यानं माघारी परतलो. पण, दुसऱ्यांना पुढं करून बोलायला लावणं हे फडणवीसांनी थांबावावं," असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange News : जरांगेंचा फडणवीसांवर जीवे मारण्याचा आरोप; बच्चू कडूंचा सबुरीचा सल्ला, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com