sanjay raut and Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar On Sanjay Raut : 'श्रीमान मोरारजी राऊत', असं म्हणत शेलारांनी, असं काही सुनावलं, की बस्स!

Sanjay Raut was narrated by Ashish Shelar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'सामना'तून केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.

Pradeep Pendhare

Ashish Shelar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'सामना'तून केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांचा “श्रीमान मोरारजी राऊत” असा उल्लेख करत पलटवार केला. "संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून 'हग्रलेख' लिहितात", असे म्हणत शेलार यांनी राऊत यांचे सर्वच काढले.

आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट टाकून, या अग्रलेखाला प्रत्युत्तर दिले. "महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नवीन विकास प्रकल्प होणार, असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतरतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून 'हग्रलेख' लिहितात?", असा टोला शेलार यांनी लगावला.

संजय राऊत यांच्याकडे आशिष शेलार यांनी काही उत्तर मागितली आहेत. मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महेंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन केले? या सगळयांना युनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या 15 वर्षातील उद्योग बंद झालेत, त्याचा हिशेब काढला, तर मग पुण्याच्या बजाजपासून सगळया कारखान्यांमध्ये शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच युनियन होती ना?, याची आठवण शेलार यांनी करून दिली.

"वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय? चोर तर चोर वरुन शिरजोर? मराठी कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणासावर गोळया झाडणाऱ्या स. का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना?", असा सवाल करत शेलार यांनी संजय राऊत यांच्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला.

"काँग्रसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का? दुदैवाने ज्याला वेड लागते, म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो, त्याला ना 'आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं' म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात!", अशा कडक शब्दात आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर प्रहार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT