Uddhav Thackeray | Ashish Shelar
Uddhav Thackeray | Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar On Thackeray : कुठून आला 'ठाकरे गट'? कोणत्या संस्थेची मान्यता आहे? शेलारांनी ठाकरेंना डिवचलं!

सरकारनामा ब्यूरो

Ashish Shelar On Uddhav Thackeray : एकीकडे विधान परिषदेत आपला आमदाराची प्रतोदपदी निवड व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे गटाने विलास पोतनीस यांची नियुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्न करणारआहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेने उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून आपल्या सदस्याची प्रतोद म्हणून निवडीसाठी विनंती केली आहे. विधान परिषेदेत ठाकरे गटाचे संख्याबळ आहे. त्यामुळे हा पेचप्रसंग उभारलेला असताना, आता भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित करून, ठाकरेंना कोंडीत पकडण्याच प्रयत्न केला.

शेलार म्हणाले, "प्रतोदपदासाठी ठाकरे गटाने उपसभापतींकडे पत्र पाठवले असले तरी, ठाकरे गटाला कुठलीही मान्यताच नाही. हा ठाकरे गट नेमका आला कुठून? ठाकरे गटाला विधान परिषद, विधानसभा, न्यायालय, निवडणूक आयोग, कुणाचीही अधिकृत मान्यता नाही. त्यामुळे अशा गटाला काही अर्थ राहत नाही. "

विधानसभेत शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाने ठाकरे गट समर्थक आमदारांना व्हीप बजावल्यानंतर आता विधान परिषद शिवसेना पक्षावरही हक्क सांगण्यासाठी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हालचाली सुरू केल्या आहेत.

विधान परिषद शिवसेना पक्षाचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र लिहले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची पक्षाच्या प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव मंजूर करण्यातआल्याचे शिंदेंच्या या पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT