Nawab Malik : Ed
Nawab Malik : EdSarkarnama

Nawab Malik News: नवाब मलिकांच्या अर्जावर आज सुनावणी : जामीन मिळणार?

Nawab Malik : न्यायालय जामीन मंजूर करणार का?

NCP News : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी (दि.२८ फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत मलिक हे गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं मान्य करत त्यांच्या जमीन अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती. तर अंमलबजावणी संचालनालयाने मात्र मलिक यांना गंभीर आजार नसल्याचा दावा करत, तातडीच्या सुनावणीला विरोध केला होता.

मलिक यांनी ईडीने केलेल्या अटके विरोधात जामिनासाठी अर्ज केला आहे. तसेच मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे, त्यांच्या वकीसांकडून करण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती मलिकांच्यावतीने वकिलांनी न्यायालयात केली. त्यानंतर नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Nawab Malik : Ed
Sawant : मातोश्रीवर ताबा मिळवणे हे त्यांचे दिवास्वप्न, कधीच पूर्ण होणार नाही !

मलिक हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे कोर्टाने मान्य केले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांच्या जामिनावर तातडीच्या सुनावणीसाठी निर्देश दिले होते. त्यामुळे मलिकांना काहीसा दिलासा मिळाला असून, आज त्यांच्या जामिनावर सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांना गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला अटक केली होती. तेव्हापासून मलिक हे तुरुंगात आहेत. मलिकांवर गंभीर आरोप असल्याचे कारण देत त्यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com