Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : 'चिंतातूर जंतू' म्हणत भाजपकडून ठाकरेंचा समाचार; म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : मुंबई महानगरपालिकेच्या ८८ हजार कोटी रुपयांच्या ठेवीवर भाजपचा डोळा असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. आता महापालिकेची मालमत्ता साडेचौदा टक्क्यांनी वाढल्याचा दावा करीत भाजपने ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. ठाकरेंनीच मोठ्या प्रमाणात खैरात केल्याने महापालिकेच्या गंगाजळीत खड्डा पडल्याचा आरोपही करण्यात आला.

भाजप मुंबई अध्यक्ष अॅड. अशिष शेलारांनी (Ashish Shelar) ट्विट करीत ठाकरेंनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. तसेच ठाकरेंच्या कार्यकाळातील कामकाजावर टीकाही केली. शेलार म्हणाले, 'मुंबई महापालिकेची मालमत्ता साडेचौदा टक्के वाढली आहे. पण चिंतातूर जंतू ठेवी कमी झाल्याची ओरड करीत आहेत. त्यांनी 12 हजार कोटींची बिल्डरांना प्रीमियम सुटीची खैरात वाटली. पालिकेच्या तिजोरीत एवढा मोठा खड्डा पडला, हे मात्र नजरअंदाज केले जातेय.'

सध्या मुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरही माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी टीका केली. यावर शेलार म्हणाले, 'दावोसमध्ये गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राने तीन लाख 53 हजार 675 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत. त्यात दोन लाख रोजगार निर्माण करणाऱ्या एका लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योजकांनी स्वारस्य दाखवले आहे. असे असतानाही मुख्यमंत्र्यांसोबत 50 लोक कशाला? काहीच मिळणार नाही महाराष्ट्राला, म्हणून इथले चिंतातूर जंतू बोंबाबोंब करीत आहेत,' अशा शेलक्या शब्दांत शेलारांनी सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे (Uddhav Thackeray) नेहमीच असत्य आणि भ्रामक गोष्टी समाजात पसरवत असल्याचा आरोपही शेलारांनी केला. ते म्हणाले, 'मुंबईतील रेसकोर्सवर नियोजित थिम पार्क मुंबई महापालिकाच उभारणार आहे. पण हे चिंतातूर जंतू कंत्राटदाराला रेसकोर्स दिल्याची ओरड करतात. असत्य, भ्रम पसरवणारे, खोटारड्यांचे हे बेफाम "घोडे" का उधळत आहेत ? हे एखादे "टूलकिट" तर नाही ना?' असा प्रश्न उपस्थित करून शेलारांनी त्याची चौकशी करण्याची गरज असल्याचेही बोलले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT