Uddhav Thackeray: भाजप, बजरंग दल, 'विहिंप'ला ठाकरे गटाकडून खिंडार...
Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजपला खिंडार पाडण्यात आलं आहे. भाजपचे पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेश करणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज काही महत्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत. यामध्ये भाजप, बजरंग दल, विश्व हिंदु परिषदेतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, त्यांचसोबत शिंदे गटाचे काही पदाधिकारी देखील ठाकरे गटात सामील होणार आहेत. एकीकडे शिवसेना कोणाची हा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाकडे आहे, असं असताना देखील दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांकडे ही पक्षप्रवेश सुरु आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील इन्कमिंग सुरु आहे, सध्या काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या कडे देखील मोठ्या संख्येत पक्षप्रवेश होत आहेत. आज जो पक्षप्रवेश होणार आहे, त्यामध्ये भाजप सोबत शिंदे गटाचे देखील पदाधिकारी आहेत, त्यामुळे शिंदे गटाला खिंडार पाडण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ नेते गिरीश महाजन वारंवार वक्तव्य करत आहेत की भाजप मध्ये येत्या काही दिवसात मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. भाजप मध्ये इन्कमिंग सुरु असणार आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणूकीच वारं दिसून येत आहे. याचं अनुषंगाने प्रत्येक पक्षात जास्तीत जास्त लोकं यावी ही प्रत्येकाची इचछा असते. पक्ष मोठा व्हावा यासाठी पक्षात लोकं यासाठी सगळेच पक्ष काम करत आहेत. मात्र भाजपमध्ये आता मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत, आणि महाविकास आघाडीला धक्का बसेल असे पक्ष प्रवेश होतील असं ही वक्तव्य नेत्यांकडून केली जात आहेत.
कोण पक्षप्रवेश करणार आहेत
1.प्रदिप उपाध्याय
भाजपा:उत्तर मुंबई जिल्हा सचिव
2. घनश्याम दुबे
विश्व हिंदू परिषद: गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख राष्ट्रीय कार्याध्यक्ष:भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषद
3. रविचंद्र उपाध्याय :
विश्व हिंदू परिषद : जिल्हा कोषाध्यक्ष (माजी) उत्तर मुंबई, बोरिवली
4:अक्षय कदम
आंतरराष्ट्रीय बजरंग दल उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष
5: माधवी शुक्ला भाजपा:जिल्हा महिला उपाध्यक्ष (पूर्व) मिरा भाईंदर
6: राम उपाध्याय भाजपा:जिल्हा महासचिव मीरा भाईंदर
7 : संजय शुक्ला
अखिल भारतीय ब्राम्हण परिषदः राष्ट्रीय महासचिव
8: प्रदिप तिवारी
शिंदे गट जिल्हा महासचिव मीरा भाईंदर
9: दिपक दुबे
विश्व हिंदू परिषद : जिल्हा सुरक्षा प्रमुख, बोरिवली
10:दिनेशकुमार यादव
विश्व हिंदू परिषद : तालुका प्रमुख (प्रखंड) बोरिवली
11: सूरज दुबे
बजरंग दल तालुका (प्रखंड) प्रमुख यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

