Uddhav thackeray, sunil raut, ashish shelar  Sarkarnama
मुंबई

Sunil Raut News : शेलारांनी काढला उद्धव ठाकरेंचा लंडन दौरा; सुनील राऊतांचं जशास तसं प्रत्युत्तर

Bjp Vs Shivsena Politcial War : आशिष शेलारांच्या टीकेला ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप-ठाकरे गटातील शाब्दिक वाद वाढण्याची शक्यता आहे.

Sachin Waghmare

Shivsena News : लोकसभा निवडणुकीचा धुराळा बसला असून निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. त्यामुळे काही काळ राजकीय वातावरण शांत राहील असे वाटत असतानाच मुंबईत नालेसफाईच्या कामावरून वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप व शिवसेना ठाकरे गटाकडून या मुद्द्यावरून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करीत लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे वाद चांगलाच रंगला आहे.

नालेसफाई समाधानकारक झाली नसल्याचे नमूद करत आशिष शेलारांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरातील नालेसफाईची पाहाणी केली. त्यानंतर आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहाणी करायला गेले आहेत का? असा सवाल करीत त्यांना डिवचले होते.

दरम्यान, आशिष शेलारांच्या (Ashish Shelar) टीकेला ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप-ठाकरे गटातील शाब्दिक वाद वाढण्याची शक्यता आहे.

शेलार यांनी केलेल्या टीकेचा शेलक्या शब्दांत समाचार घेताना सुनील राऊत यांनी जोरदार टीका केली. पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi ) दहा वर्षांमध्ये शंभर जग फिरून आले. त्यावेळी ते काय करायला गेले होते. उद्धव ठाकरे सध्या लंडनला गेले आहेत तर त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे. मोदी वर्षातून पन्नास वेळा जात आहेत. मोदी यांना आशिष शेलार काय सल्ला देणार आहेत ? असा सवाल उपस्थित केला आहे.

शेलार यांनी पीएम मोदींना योग्य सल्ला द्यावा. त्यांनी जे काय वाचन दिले आहे? ज्या बाबींची मोदींनी गॅरेंटी दिलेली आहे. ते पूर्ण करा. मग आम्हाला विचारा उद्धव ठाकरे कुठे गेले आहेत ते विचारा असेही सुनील राऊत यांनी सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चोरून आणलेले आमदार किती दिवस राहतील ?

गेल्या दोन वर्षात तुम्ही दोन पक्षांतून चोरून आणलेले आमदार किती दिवस राहतील ही शंका आहे. त्यामुळे ते आमदार सांभाळा, असा सल्ला देत सुनील राऊत म्हणाले की, गेली दहा वर्ष झाली पीएम मोदी संपूर्ण जगभर फिरतात, त्यावर आम्ही कधीच ऑब्जेक्शन घेत नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी जगभरात त्यांचा नंबर होता. भाजपकडून जरी लोकसभा निवडणुकीत 400 पार जागा जिंकण्याचा दावा केला जात असला तरी तो पूर्ण होऊ शकत नाही.

SCROLL FOR NEXT