Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपवासी होताना चव्हाण म्हणाले, "राजकीय आयुष्याची एक नवीन सुरुवात करत आहे. मागील 38 वर्षांच्या राजकीय प्रवासात हा बदल करत आहे, असे भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण म्हणाले. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, एकेकाळी काँग्रेस पक्षात असताना त्यांचे जवळचे सहकारी आणि विद्यमान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, "अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे आमची ताकद वाढली आहे. विशेषत: मराठवाड्यात भाजपची ताकद वाढली आहे. आम्ही राज्यासह देशभरात चांगली कामगिरी करू, आम्ही चव्हाण यांचं पक्षामध्ये स्वागत करत आहोत," अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांचं भाजपत स्वागत करतो. चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशानं भाजप आणि महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचे काम सुरू केले आहे. जो बदल आणि परिवर्तन भारतात दिसायला लागला, त्यामुळे आपणही देशाच्या मुख्य प्रवाहात आणि मोदींसारख्या मजबूत नेतृत्वात काम करावं, असं अनेकांना वाटतं."
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.