Indapur Politics : भरणेंसाठी धोक्याची घंटा... हर्षवर्धन पाटील-प्रवीण माने एकाच व्यासपीठावर...

Harshvardhan Patil-Praveen Mane Meet : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीचा परिणाम इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर दिसू लागला आहे.
Harshvardhan Patil-Praveen Mane
Harshvardhan Patil-Praveen ManeSarkarnama
Published on
Updated on

Walchandnagar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीचा परिणाम इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर दिसू लागला आहे. कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षासोबत जाऊनही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यातून विस्तवही जात नाही. आता तर भाजपचे पाटील आणि शरद पवार गटाचे इंदापूरमधील बडे प्रस्थ प्रवीण माने एकत्र आले होते. विशेष म्हणजे त्यांनी एकमेकांचे कौतुकही केले. आमदार भरणेंसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. (Harshvardhan Patil-Praveen Mane on the same platform)

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे अजित पवार यांच्यासोबत महायुतीसोबत गेले आहेत. पण भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यात मात्र मनोमिलन झालेले नाही. ते दोघेही एकमेकांचा खरपूस शब्दांत समाचार घेताना दिसत आहेत. त्यातच पाटील यांची शरद पवार यांच्यासोबत गेल्या काही दिवसांत सलगी वाढली आहे. राष्ट्रवादीतील फुटीचा इंदापूरच्या राजकारणावर परिणाम होताना दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Harshvardhan Patil-Praveen Mane
Abhijeet Patil : पवारांच्या दौऱ्याचे स्टेअरिंग अभिजित पाटलांच्या हाती; पंढरपूर ते सोलापूर प्रवासाची रंजक कहाणी...

शरद पवार गटाचे नेते आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात सलोखा दिसत आहे. तसेच बांधकाम विभागाच्या कार्यक्रमाच्या एका कोनशिलेवर सुप्रिया सुळे यांचे नाव नसल्याने इंदापुरात जोरदार गोंधळ झाला हेाता. त्याचे कवित्व संपण्याच्या आतच पाटील आणि शरद पवार गट जवळ येताना दिसत आहे. शिरसटवाडीच्या कार्यक्रमाला तर सोनाई उद्योगसमूहाचे प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र आले होते. एकाच व्यासपीठावर आलेल्या दोघांनीही एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले.

याच कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी पवार कुटुंबाने दिलेल्या संधीमुळे आपण जिल्हा परिषदेचा सभापती झालो. सर्वसामान्यांची कामे करण्याची संधी मिळाली. गावच्या विकासासाठी युवकांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे, असे सांगितले.

हर्षवर्धन पाटील यांनी नेहमीप्रमाणे नाव न घेता माजी मंत्री भरणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २००० कोटींनी कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. तालुक्याचे शेतीचे वार्षिक उत्पन्न ३२०० कोटी रुपयांवरून १२०० कोटी रुपयांवर आले आहे, ते कोणामुळे कमी झाले, याचा विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Harshvardhan Patil-Praveen Mane
Dharashiva Loksabha : सावंतांची आता थेट लोकसभेच्या आखाड्यात उडी...

पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील सणसर कट भुईसपाट झाला आहे. तसेच, त्या सणसर कटमधून 2014 पासून एक थेंबही पाणी आलेले नाही. या कटमधून तालुक्याला प्रतिवर्षी दोन टीएमसी पाणी मिळायचे. गेल्या दहा वर्षांपासूनचे 20 टीएमसी पाणी गेले कुठे. धरण, कालवे आणि क्षेत्रही तेच आहे. मात्र दारोळ्या बदलला आहे, त्यामुळे तो बदलला किती फरक पडतो, हे जनतेच्या लक्षात आले आहे.

इंदापूर तालुक्यातील एका विचाराची गावे फोडण्याचे काम काही जणांकडून करण्यात येत आहे. खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी घातले जात आहे. त्यातून सामान्य माणसाला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

R...

Harshvardhan Patil-Praveen Mane
Pune News : युवक काँग्रेसची मागणी विखे मान्य करणार; आपल्याच खात्यातील विभागाची चौकशी लावणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com