Ashok chavan  Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan : अखेर ठरलं! चव्हाणांची आजपासून नवी इनिंग; म्हणाले, "माझ्या..."

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता.

Akshay Sabale

महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रभावी नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांच्या राजीनाम्यानं खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर दोन दिवसांत पुढील निर्णय जाहीर करू, असं चव्हाणांनी सांगितलं होतं. पण, आज मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) चव्हाण भाजपत प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाणांनी स्वत: प्रवेशाबाबत माहिती दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ( Ashok Chavan Join Bjp Latest News )

अशोक चव्हाण म्हणाले, "आज माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्यानं सुरूवात करत आहे. मी अधिकृतरित्या भाजपत प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करेन. यावेळी अन्य जिल्ह्यातील संभाव्य नेते भाजपत प्रवेश करू शकतात."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांनी तुमच्याशी संपर्क केला का? या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणाले, "तो विषय संपला आहे. आता नवीन सुरूवात करतोय."

मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींपाठोपाठ अशोक चव्हाण बाहेर पडल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षालाही गळती लागल्याचं स्पष्ट झालं आहे. चव्हाणांबरोबर आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. पण, अशोक चव्हाण आजच भाजपत प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT