Sanjay Raut Latest News : चव्हाणांनी स्वत:चे बारा वाजवून घेतले, शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच ते काँग्रेस सोडणार होते...

Maharashtra Politics : चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च्या क्लिप ऐकाव्यात..
Sanjay Raut: News
Sanjay Raut: NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai: 'काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देऊन स्वत:चे बारा वाजवून घेतले आहे,' अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चव्हाणांची खिल्ली उडवली आहे. चव्हाण भाजपमध्ये गेल्याने महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, ते दोन वेळा पराभूत झाले आहेत. दोन वर्षांपूवी एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच चव्हाण काँग्रेस सोडणार होते, असा गौप्यस्फोट राऊतांनी आज केला. Sanjay Raut Latest News

Sanjay Raut: News
Satara News: एका चिठ्ठीनं राखली सत्ता; शरद पवार गटाचा शिंदे गटाला धक्का

चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यसभा निवडणुकीत मतविभागणी होणार नाही. सध्या भाजपकडून भ्रष्टाचाऱ्याचे शुद्धीकरण होत आहे. भाजपने काँग्रेसचे शुद्धीकरण सुरु केले आहे. मुळ भाजप राहिला आहे काय? भाजपा काँग्रेसमय झाली आहे, अशी टीका राऊतांनी केली.

चव्हाणांच्या आदर्श गैरव्यवहाराच्या वेळेस भाजपने त्यांच्यावर टीका केली, हे ढोंग होते का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. "भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च्या क्लिप ऐकाव्यात," असा सल्ला त्यांनी दिला.

नांदेड कुणाचाही बालेकिल्ला नाही, अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही, अन् अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी नाही, अशा शब्दांत पक्षातील फुटीवर राऊतांनी टीकास्त्र डागले.

"ज्यांच्यावर आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांचाच पक्ष प्रवेश थाटात केला जातो आहे. भाजपच्या नेत्यांना विस्मरणाचा रोग झालेला दिसतो, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजपा बरा’ अशा शब्दात त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com