Ashok Chavan Nanden Corporation Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan : चव्हाणांची भाजपला 'साथ', आता नांदेडच्या माजी नगरसेवकांनीही घेतला मोठा निर्णय

Jui Jadhav

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) भाजपत प्रवेश केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या होत असलेल्या प्रगतीनं प्रभावित होऊन पक्ष प्रवेश करत आहे," असं चव्हाणांनी म्हटलं. चव्हाणांबरोबर काँग्रेसमधील आमदारही भाजपत जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण, नांदेडमधील माजी नगरसेवकांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर काँग्रेसचे आमदारही भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, त्यांच्या मतदासंघात परिस्थिती काहीशी वेगळी आहे. चव्हाणांच्या मतदासंघातील माजी नगरसेवक काँग्रेसबरोबर ( Congress ) असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला माजी नगरसेवक हजर होते. त्यामुळे चव्हाणांबरोबर न जाता काँग्रेसचाच 'हात' धरून राहण्याचा निर्णय माजी नगरसेवकांनी घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चव्हाणांनी एका रात्रीत भाजपमध्ये प्रवेश केला. याची काहीच कल्पना मतदारसंघात न दिल्यानं नाराजीचा सूर पसरल्याचं दिसून येत आहे. "भाजपमधील प्रवेशानंतर मी कोणालाही माझ्याबरोबर या हे आमंत्रण दिलं नाही," असं विधान चव्हाणांनी केलं होतं. त्यामुळे येत्या काळात नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

प्रवेशानंतर चव्हाण काय म्हणाले?

"मी नव्या राजकीय आयुष्याचा प्रारंभ करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीमध्ये योगदान देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. यापुढील काळात 'सबका साथ, सबका विकास' या सूत्रानुसार देशाच्या विकासकार्यात सकारात्मक आणि भावनेने आणि विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवून भाजपचे कार्य करीन," असं चव्हाणांनी सांगितलं.

"काँग्रेस दिशाहीन"

चव्हाणांच्या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. "काँग्रेस पक्ष कुठल्या दिशेला चालला आहे, हे कोणालाही समजत नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील विकासाच्या विचारधारेत सामील व्हावे, असं अनेक नेत्यांना वाटत असल्यानं भाजपत येत आहेत. काँग्रेसला पक्ष सांभाळता येत नाही," असा टोला फडणवीसांनी लगावला.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT