Maharashtra Congress: लोकसभेसाठी काँग्रेसचं मोठं पाऊल,दिग्गजांचा समावेश असलेल्या 'या' समितीची घोषणा

Loksabha Election 2024 : 52 नेते आणि पदाधिकाऱ्यांची समिती गठीत...
Congress Manifesto Committee
Congress Manifesto Committee Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसनेही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील निवडणूक समितीची घोषणा केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक समिती स्थापन करण्यात आली असून या महाराष्ट्र काँग्रेस समितीच्या प्रस्तावाला काँग्रेसपक्ष श्रेष्ठींकडून मान्यता देण्यात आली आहे.

Congress Manifesto Committee
White Paper News : आधी मनमोहन सिंग यांचं कौतुक अन् काही तासांतच कामगिरीची चिरफाड; संसदेत दोन दिवस ठरणार वादळी

समितीत 52 नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश

संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 52 नेते आणि पदाधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. (Loksabha Election 2024)

या समितीमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, मुकूल वासनिक, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, सुनिल केदार यांच्यासह रजनी पाटील, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे , वर्षा गायकवाड अशा एकूण 52 नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सावंत, लोंढेचा समावेश नाही...

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समितीमध्ये काँग्रेसचे अभ्यासू नेते सचिन सावंत यांचा समावेश केला नसल्याचे दिसून आले आहे. सचिन सावंत हे नेहमीच पक्षाची अभ्यासपूर्ण भूमिका मांडताना दिसून येतात. मात्र, सचिन सावतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून डावलले जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे.

याशिवाय पटोलेंचे समर्थक मानले जाणारे काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनाही या समितीमध्ये समाविष्ट केले नसल्याचे दिसून आले आहे. पटोले यांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Congress Manifesto Committee
Rohit Pawar : भाजपचा पुण्यात राडा; रोहित पवार राज्य सरकारवर बरसले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com