Ashok Chavan Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा 'हात' सोडला; विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्त

MLA Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याच्या बातम्यांमुळे काँग्रेस हादरली, राहुल गांधींच्या मुंबईतील न्याय यात्रेच्या समारोपापूर्वी काँग्रेसमध्ये अनेक भूकंप होणार?

Avinash Chandane

Ashok Chavan News :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेस पक्षात भूकंप झाला आहे. या घडामोडीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

गंभीर बाब म्हणजे सदस्यत्वाच्या पत्रात माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केल्यामुळे सुरुवातीला गोंधळ झाला. त्यानंतर खुद्द अशोक चव्हाणांनीच ट्विट करत 'आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे,' असे स्पष्ट केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विधानसभा अध्यक्षांची (Rahul Narwekar) भेट घेऊन राजीनामा दिला. याबाबत काँग्रेस (Congress) किंवा भाजपमधून (BJP)अजून कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अशोक चव्हाण हे कट्टर काँग्रेसचे नेते मानले जात होते. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हेदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कट्टर काँग्रेसचे घराणे असताना अशोक चव्हाणांनी काँग्रेसला राम राम केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वास्तविक अनेक महिन्यांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. आणि प्रत्येकवेळी अशोक चव्हाण या चर्चेला इन्कार करत असत. विशेष म्हणजे भाजपच्या काही नेत्यांनी जाहीरपणे चव्हाण भाजपमध्ये येतील, अशी वक्तव्ये केली होती. त्यालाही अशोक चव्हाणांनी उत्तर दिले होते.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप होईल, अशी शक्यता काही दिवसांपूर्वी वर्तवली जात होती. त्याप्रमाणे मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस सोडली आहे. आजच मुंबईचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष जगदीश अण्णा कुट्टी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता अशोक चव्हाणांचा काँग्रेसचा राजीनामा आणि त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT