Ashok Chavan, Uddhav Thackeray News  Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan News : अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने ठाकरे गटाची अडचण? लोकसभेच्या 'त्या' 13 जागा ठरणार कळीचा मुद्दा

Uddhav Thackeray News : शिवसेनेते फूट पडून 40 आमदार आणि 13 खासदार शिंदे गटात गेले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Congress News : शिवसेनेते फूट पडून 40 आमदार आणि 13 खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे या 13 खासदाराच्या जागेवर मिरीटनुसार निर्णय घेण्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे. विद्यमान असलेल्या खासदारांच्या जागा त्याच पक्षाला सोडण्यात येईल, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांनी आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी चव्हाण म्हणाले, काँग्रसमध्ये (Congress) झालेल्या चर्चेची माहीती देण्यात आली. जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही. फक्त विचारांवर चर्चा झाली.

सखोल चर्चा झाली नाही. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात होणार आहे. या संदर्भात देखील विरोधी पक्षांच्या भूमिकेत संदर्भात चर्चा झाली. ही औपचारीक भेट होती. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटा ज्या जागा जिंकल्या होत्या त्या त्यांनाच मिळाव्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

यावर अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले असे नाही आहे. चर्चा झाल्यानंतर हा विषय मार्गी लागू शकतो. राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. तिघांनाही समजून घ्यावे लागेल. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि मेरीट डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात येईल. ज्या ठिकाणी जागा निवडून आलेल्या होत्या, जे खासदार आहेत तिथे अडचणी येणार नाहीत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मात्र, जे खासदार इतर पक्षात गेले. तेथील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे हा प्राथमिक विषय आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात यावा, असे चव्हाण म्हणाले. ठाकरे गटाचे एकूण 18 खासदार होते. त्यांच्यापैकी 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागा कळीचा मुद्दा होऊ शकतो. चव्हाण यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधान आले आहे.

अजित पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक होणार होती. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून या बैठकीकडे पाठ फिरवण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) सर्व काही ऑल इज वेल नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चव्हाण यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्या 13 जागा कोणत्या?

दक्षिण मध्य (मुंबई), उत्तर मध्य (मुंबई), यवतमाळ, कल्याण, हातकलंगणे, कोल्हापूर, बुलडाणा, नाशिक, मावळ, हिंगोली, रामटेक, परभणी, शिर्डी या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT