BRS Maharashtra News : 'केसीआर' आघाडीचे टेन्शन वाढवणार? ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत : प्रकाश आंबेडकरांना दिला 'हा' प्रस्ताव...

Prakash Ambedkar News : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपला आपल्या पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला आहे.
K. Chandrashekar Rao, Prakash Ambedkar News
K. Chandrashekar Rao, Prakash Ambedkar NewsSarkarnama
Published on
Updated on

K. Chandrashekar Rao, Prakash Ambedkar News : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपला आपल्या पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला आहे. भारत राष्ट्र समितीला त्यांनी देशभरात नेण्याचे ठरविले आहे. त्याची सुरूवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी करिता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे. बीआरएसने महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रानी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत मुंबईत या संदर्भातील बैठकीत बीआरएसकडून प्राथमिक प्रस्ताव देण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्रातील एका जवळचे व्यक्तीने हा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील ताकद पाहता बीआरएसने हा प्रस्ताव दिला आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे बीआरएस पक्षाचे लक्ष लागलेले आहे.

K. Chandrashekar Rao, Prakash Ambedkar News
Vishwajeet Kadam News : विश्वजीत कदम भाजपात जाणाच्या चर्चांना सिद्धरामय्यांच्या सभेमुळे पूर्णविराम?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्याच बरोबर राज्यातील अनेक माजी आमदार-खासदारांसह बड्या नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचा फटका दोन्ही काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बीआरएसने भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना ही मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शट्टे यांनीही बीआरएसने ऑफर दिली होती.

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठ्या प्रमाणात मत मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र, वंचित आणि एमआयएम एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत युतीमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे जर बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली तर पुन्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फटका बसण्याची शक्यता आहे.

K. Chandrashekar Rao, Prakash Ambedkar News
BRS offered CM Post To Raju Shetti : पंकजा मुंडेंनंतर 'बीआरएस'चा राजू शेट्टींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; शेट्टी म्हणाले...

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महाराष्ट्रात पूर्वीच युतीची घोषणा झाली आहे. मात्र, राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात अजून निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार पराभूत झाले. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहता बीआरएसने युतीचा प्रस्ताव दिला आहे. जर हा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मान्य झाला तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com