Pratibha Chakankar speaking to media after Shirdi police interrogation in the Kharat case, denying all financial allegations. Sarkarnama
मुंबई

Pratibha Chakankar Probe : 'दमानियांचे CDR खोटे की फडणवीसांचं...'; चौकशीनंतर चाकणकरांनी "माझा संबंध नाही", म्हणताच अंधारेंनी सर्वांनाच घेरलं

Ashok Kharat Case Pratibha Chakankar Probe : 'स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा एन्जॉय पीरियड संपत का नाही? एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे?'

Jagdish Patil

Mumbai News, 14 Apr : भोंदू अशोक खरातशी जवळीक असलेल्या आणि त्याला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची खरात प्रकरणात चौकशी कधी करणार? असा सवाल राज्यभरातून उपस्थित केला जात होता.

अशातच काल शिर्डी पोलिसांनी खरात प्रकरणातील संशयित खातेदार असलेल्या प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची आठ तास चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

आपण कधीही समता पतसंस्थेत खाते उघडलेले नाही किंवा तिथे गेलेलो नाही, असा मोठा दावा त्यांनी केला. तरी समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आवं आहे. स्वत: प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या खात्यांवरुन 2 कोटींच्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे.

मात्र, आता माझ्या नावाची खाती बनावट असून मी सह्या देखील केलेल्या नाहीत. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो आणि शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रूपाली चाकणकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'आम्ही 'एसआयटी'ला भेटायला गेलो होतो 'एसआयटी'च्या मुख्य इमारतीपासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते.

पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पस मध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिविलेज का मिळाले? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीये, असं म्हणत त्यांनी एसआयटीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

तसंच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांच म्हणणं आहे तर अजून पर्यंत दमानियांना अटक का केली नाही दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ?

स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा एन्जॉय पीरियड संपत का नाही? एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे?

कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एसआयटीला ? दमानिया महाराष्ट्राला? SIT पीडित महिलांना ? कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे, असं म्हणत अंधारे यांनी प्रतिभा चाकणकर यांच्या प्रतिक्रियेवरून सर्वांनाच घेरलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT