Ashok Kharat Police Custody : कोठडीत पोलीस मारतात का? न्यायाधीशांच्या प्रश्नावर अशोक खरातच्या तोंडून निघाला एकच शब्द...

Ashok Kharat SIT investigation : खरातला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एसआयटीने खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील तपासाचा हक्क अबाधित राखून चौथ्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी खरातचा ताबा मिळणे आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या अर्जात नमूद केलं आहे.
Ashok Kharat Arrest | Police Custody
Ashok Kharat appears before the court via video conferencing in the ongoing fake baba case, highlighting the police custody proceedings.Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Police Custody : भोंदू बाबा अशोक खरात याला तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (ता.१३) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं.

या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी खरातला पोलिसांच्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्याने केवळ एका शब्दात उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला नाव विचारलं आणि त्याची ओळख पटवून घेतली. त्यानंतर न्यायाधीशांनी कोठडीत पोलीस मारतात का?

पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? असा प्रश्न विचारला. यावर खरातने केवळ एका शब्दात 'नाही' असं उत्तर देत पोलिसांविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे इतर वेळी पोलिसांना तुम्ही घोर अपराध करत आहात. तुमच्यावर कोप होईल, असं म्हणणारा खरात पोलीस कोठडीत गेल्यापासून जमिनीवर आल्याचं दिसत आहे.

Ashok Kharat Arrest | Police Custody
Ashok Kharat Case : खरातचा तुरूंगातील स्टेटस काय? मुलाच्या आठवणीत व्याकुळ; जेवणही कमी, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...

दरम्यान, आज खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एसआयटीने खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील तपासाचा हक्क अबाधित राखून चौथ्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी खरातचा ताबा मिळणे आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या अर्जात नमूद केलं आहे.

यावेळी कोर्टाने आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याचा ताबा घेण्याचा सूचना पोलिसांना दिल्या. तर खरातला उद्या पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं जाणार असून उद्याच्या सुनावणीत नेमके काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एकीकडे एसआयचीने खरात भोवती चौकशीचा फास आवळला आहे.

Ashok Kharat Arrest | Police Custody
Noida Protest Violence : पगारवाढीसाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केलेलं आंदोलन चिघळलं; 'फेज 2' मध्ये वाहने पेटवली, पोलिसांसह कंपनीवर दगडफेक

तर दुसरीकडे ईडीने देखील खरात विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. ईडीने खरातशी सबंधित नाशिक, पुण्यासह शिर्डी परिसरात छापेमारी केली आहे. ईडीने खरात नॉमिनी असलेल्या सुमारे 100 खात्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हळूहळू खरातचा पाय किती खोलात आहे हे ईडी आणि एसआयटीच्या तपासातून समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com