Ashok Kharat_Deepak Kesarkar 
मुंबई

Deepak Kesarkar: "अशोक खरात केसरकरांचं शिक्षण खातं चालवत होता" राऊतांच्या आरोपांना केसरकरांचं उत्तर; नेमकं काय घडलं होतं? स्पष्टच सांगितलं

Deepak Kesarkar: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याला महिलांचा लैंगिक छळ आणि अत्याचार प्रकरणी अटक झाली आहे.

Amit Ujagare

Deepak Kesarkar: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याला महिलांचा लैंगिक छळ आणि अत्याचार प्रकरणी अटक झाली आहे. हे प्रकरण राज्यात चांगलंच चव्हाट्यावर आलेलं असताना या खरातचे भक्त म्हणून रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलेलं असलं तरी राज्यातील इतरही अनेक नेत्यांचे या खरातसोबतचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे आदींचा समावेश आहे. दरम्यान, यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत अशोक खरात कायम त्यांच्या भेटीला यायला असा खळबळजनक दावाही केला आहे. त्यांच्या या दाव्याला आता केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊतांचा आरोप काय?

दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या अशोक खरात नावाच्या बाबाच्या शिफारशीने होत असत. त्याकामी बाबा अनेकदा नरिमन पॉइंट ट्रायडेंटमध्ये मुक्कामास असत, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांचा हा बाबा गुरु महाराज आहे. या बाबाच्या जवळ ५८ हून अधिक आक्षेपार्ह क्लिप्स सापडल्यानं मंत्रिमंडळातील निम्मे मंत्री हे तणावाखाली आहेत, यांपैकी काहीजणांना आयसीयूत भरती करावं लागेल. या भोंदूबाबनं पोलिसांना जी माहिती दिली आहे. त्यानुसार, राज्याच्या मंत्रिमंडळातील ९ मंत्री हे या भोंदूबाबाचे भक्त होते आणि त्यांच्याकडं जाऊन अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करायचे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

केसरकरांचं स्पष्टीकरण

काही राजकीय आरोप केले जातात ते अत्यंत चुकीचं आहे. संजय राऊतांनी जे आरोप केले आहेत की अशोक खरात हे माझं खात चालवत होते, पण ते कसं चालवणार? ते एकदाही माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. माझं खात चांगल्याप्रकारे चालत नव्हतं असं त्यांनी जे म्हटलं आहे. याची त्यांनी माहिती घ्यावी, माझ्या काळात शिक्षण खात्यात आणि मराठी भाषेसंदर्भात जे निर्णय झाले क्वचितच एखाद्या मंत्र्याच्या कालावधीत झाले असतील. त्यामुळं विभागाचा आणि व्यक्तिगत संबंधित त्या व्यक्तीशी नेऊन जोडणे हे चुकीचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT