<div class="paragraphs"><p>CM uddha Thackeray- Adity Thackeray&nbsp;</p></div>

CM uddha Thackeray- Adity Thackeray 

 

Twitter/@ANI

मुंबई

आता शिवसेनेत पन्नाशी ओलांडलेल्या इच्छूकांना उमेदवारी नाही?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. मागील २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेने (Shivsena) आपला भगवा सतत फडकावत ठेवला आहे. पण आगामी महापालिकांच्या निवडणूकीची जबाबदारी आता शिवसेनेच्या युवा नेतृत्वाकडून लढवली जाणार आहे. त्यामुळे यावेळी तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांना तिकीट मिळवण्यासाठी वेट अँड वॉच वरचं राहावं लागणार आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपल्या खांद्यावरचा भार हलका केला असल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या आधीच म्हटलं होतं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये युवासेनेची सरशी असणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. त्यादृष्टीने आता आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेतील नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना नगरसेवक तयार करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत पन्नाशी खालील उमेदवार देण्याचा शिवसेनेचा विचार सुरू असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

संसदीय राजकरणाची पहिली पायरी मानल्या जाणाऱ्या महापालिकेत आदित्य ठाकरेंची टिम तयार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता पन्नाशी ओलांडलेल्या इच्छूक उमेदवरांना बाजूला ठेवून युवा सेनेला प्रामुख्याने स्थान देण्याचा विचार पुढे आला आहे. तर दुसरीकडेकाळात ५० वर्षावरील नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर आलेले निर्बंध, लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असले तरी इतर अनेक गोष्टींमुळे पन्नाशीच्या पुढील उमेदवारांना तिकिटासाठी थोडी वाटच पहावी लागणार आहे.

त्यामुळे आगामी निवडणूकीत पन्नाशी ओलांडलेल्या इच्छूकांना उमेदवारी न देण्याचा विचार शिवसेना करत आहे. मात्र याला काही अपवादही ठरणार आहेत. ज्या प्रभागात नवे वा पन्नाशी खालील उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सक्षम सापडणार नाहीत अशा ठिकाणी पन्नाशीवरील किंवा जुन्याच उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. शिवसनेनेसाठी महत्वाच्या आणि पन्नाशी ओलांडलेल्या उमेदवारांचा देखील यात विचार केला जाणार आहे. सध्याची शिवसेने नगरसेवकांची फळी ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT