आता मंत्रालयाचा नवीन पत्ता शिवतीर्थ..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (mns sandeep deshpande) यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
uddhav thackeray, sandeep deshpande

uddhav thackeray, sandeep deshpande

sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयालात (mantralay) जात नाही, अशी टीका विरोधक नेहमीच करीत असतात. कोवीड काळातही मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी वर्षा या सरकारी निवासस्थानातून काम करीत होते. ते मंत्रालयातील आपल्या दालनातही कधीतरी जातात, यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होते. आता मनसेने मुख्यमंत्र्याच्या या 'कारभारा'वर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (mns sandeep deshpande) यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशपांडेंनी शिवसेना, मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका करीत त्यांची खिल्ली उडविली आहे. राज्यातील जनता आपले प्रश्न, अडचणी घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जातात, असे मनसेने म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रालयाचा नवीन पता शिवतीर्थ (shivtirth) असल्याची मनसेने म्हटलं आहे.

संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत मंत्रालयातचा फोटो शेअर केला आहे. या टि्वटमध्ये त्यांनी तीन वर्षांचा कालावधीत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय कसे बंद आहे. हे चित्राच्या माध्यमातून रेखाटलं आहे. आपल्या टि्वटमध्ये देशपांडे म्हणतात, ''म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे,'' टि्वटमध्ये त्यांनी तीन वर्षांचा कालावधी दाखवला असून कार्यालय बंद असल्यामुळे धूळ बसलेली दाखवले आहे.

काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ते घरी विश्रांती घेत आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री हजर राहिले नाही यामुळे विरोधकांकडून टीकास्त्र डागण्यात येत आहे. राज्याचे काम अधिक प्रमाणात घरुनच पाहत आहेत. तसेच राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्री व्हिसीद्वारे उपस्थिती लावत असतात.

<div class="paragraphs"><p>uddhav thackeray, sandeep deshpande</p></div>
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसची मोठी घोषणा

शिवसेना-भाजप म्हणजे दोन भावांतील भांडण ; चंद्रकांतदादांनी दिले युतीचे संकेत

पिंपरी : युती तुटल्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप (BJP) व त्यातही त्यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे खूप आक्रमक विधानं आतापर्यंत करीत होते. पण पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बुधवारी (ता. ५) केलेल्या वक्तव्याने त्याला प्रथमच छेद दिला. कारण त्यांनी पुन्हा शिवसेनेबरोबरच्या (Shiv Sena) युतीचे स्पष्ट संकेत दिले. आमचे हे दोन भावांतील भांडण असून पुन्हा सबंध निर्माण करावे लागतात, असे ते म्हणाले, ''राजकारणात कॉँक्रीट असं काही नसतं. शेवटच्या क्षणी तेथे काहीही होऊ शकते,'' असे सूचक विधान त्यांनी केलं.

<div class="paragraphs"><p>uddhav thackeray, sandeep deshpande</p></div>
सांगलीत कोरोना नाही का, पुणे जिल्ह्यातून होतेय विचारणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com