Ajit Pawar  sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Video : आमदार गैरहजर, 80 जागांची मागणी; अजितदादांच्या बैठकीची इनसाईड स्टोरी

Roshan More

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक बुधवारी (ता.18) बोलवली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार होती. तसेच मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र, या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती आहे.

वैयक्तिक अडचणीचे कारण सांगत काही आमदार गैरहजर राहिल्याचे 'साम टिव्ही'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

विधानसभेसाठी 70 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा आग्रह या बैठकीत आमदारांनी धरला.तसेच 2019 च्या निवडणुकीमध्ये लढलेल्या जागांपेक्षा 10 ते 15 जागा जास्त लढवाव्यात तसेच महामंडाळाचा नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती आमदारांनी अजित पवारांकडे या बैठकीत केली.

या बैठकीत अजित पवार गटाकडून 80 जागा मागणी करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच विद्यमान आमदारांचे तिकीट न कापण्याचे आश्वासन देखील अजित पवारांनी दिले आहे.

अजित पवार हे महायुतीमध्ये 80 जागा मागण्याच्या तयारी असल्याचे माहिती आहेत. भाजपकडून 150 जागा तसेच शिंदे गटाकडून 120 जागांसाठी आग्रह आहे. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच होणार आहे.

अजितदादांची लोकप्रियता वाढली

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत अजित पवार यांची लोकसभेनंतर लोकप्रियता वाढली असल्याचे सांगण्यात आले. अजित पवार गटासाठी एका खासगी संस्थेने सर्व्हे केला होता.त्या सर्व्हेमध्ये माझी लाकडी बहीण योजनेमुळे लोकसभेनंतर अजित पवारांची लोकप्रियता वाढल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे. या संस्थेने आमदारांसोबर प्रेझेंटेशन दिल्याची देखील माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT