Nagpur Project : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले होते. आता या प्रकल्पानंतर आणखी एका महाराष्ट्रात येणारा मोठा प्रकल्प गुजरातला गेला असल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे हा प्रकल्प नागपूरला येणार होता.
तब्बल 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला रिन्यूएबल अॅण्ड ग्रीन एनर्जी कंपनीचा (रिन्यू) सोलर पॅनल प्रकल्प गुजरातला गेला आहे.
महाराष्ट्रात उद्योगासाठी आकारण्यात येणारे वीजदर जास्त असल्याचे तसेच अधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याने हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची माहिती आहे.
हा प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात 300 एकर जागेवर होणार होता. तीन हजार युवकांना रोजगार देण्याची कंपनीची योजना होती. मात्र, हा प्रकल्प गुजरातला गेल्याने स्थानिकांची निराशा झाली आहे.
याआधी जे प्रकल्प गुजरातला गेले ते महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे गेल्याची टीका शिंदे गटाकडून करण्यात येत होती. मात्र, आता महायुतीच्या काळातही मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याने महाविकास आघाडीच्या निशाणावर महायुती सरकार असणार आहे.
नागपूरला येणार प्रकल्प गुजरातला गेल्याने महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्प गुजरात जात असल्याने महाविकास आघाडी हा प्रचारात मोठा मुद्दा बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आधी महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.