Uddhav Thackeray-Devendra Fadnavis- Bawankule Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena UBT : भाजपचं मिशन मुंबई-कोकण! विधानसभेला ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठीचा प्लॅन तयार

BJP Vs Shivsena UBT Mumbai Kokan : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी रणनीती आखल्याची माहिती आहे. मुंबई आणि कोकणात सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपचा प्लॅन तयार असून या दोन्ही ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे.

Jagdish Patil

Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपली रणनीती आखली आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते झपाटून कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निकालामुळे विधानसभेला प्रचंड काम करण्याची गरज असल्याचं आता भाजप नेत्यांच्या लक्षात आलं आहे.

त्यामुळेच त्यांनी आता आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत भाजपचं मुख्य टार्गेट हे शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) असणार आहे. शिवसेनेतील फूटीपासून शिवसेना ठाकरे गट आणि भाजप एकमेकांविरोधात अधिक आक्रमक झाले आहेत. तर आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा शिंदे गट नव्हे तर भाजप असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाकडून केलं जातं.

याच सर्व पार्श्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी रणनीती आखल्याची माहिती आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकणात सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपचा प्लॅन तयार असून या दोन्ही ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे.

त्यामुळे कोकण आणि मुंबईत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेविरोधात भाजप अधिक आक्रमक होणार असून ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना कोकण आणि मुंबईसाठी काय केले आणि काय केले नाही? याचा पाढाच भाजप नेते वाचणार आहेत.

ठाकरेंनी काय केलं नाही हे सांगतानाच महायुती सरकारने कोकण आणि मुंबईसाठी केलेल्या विकासकामांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही भाजपने आपली यंत्रणा सज्ज केली आहे.

विकासकामांच्या मुद्द्यांसह ठाकरे गटात जे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत. त्यांना हेरून भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. तर मिशन मुंबई आणि कोकण विधानसभेची रणनीती आखण्यासाठी भाजपकडून दोन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तर मुंबईची धुरा आशिष शेलारांकडे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT