Video NCP News : 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाचा सुप्रीम फैसला होणार?

NCP Ajit Pawar Vs NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Ajit Pawar-NCP-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

याच याचिकेसंदर्भात आता येत्या 13 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे हे प्रकरण आता निकाली निघण्याची शक्यता आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ चिन्हाबाबतची सुनावणी होणार असल्यामुळे याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाचे लक्ष लागून राहिले आहे. शिवाय या सुनावणीत नेमका काय फैसला होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'खरं उत्तर...'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिल्यानंतर या निकालाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसंच आयोगाने अजित पवारांना पक्ष चुकीच्या पद्धतीने दिल्याचा दावा शरद पवार (Sharad Pawar) गटाने केला आहे. तर 13 ऑगस्ट रोजीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँड आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com