Maharashtra BJP core committee meeting Sarkarnama
मुंबई

BJP Core Committee Meeting : भाजपला हव्यात 170 जागा; विधानसभेसाठी कोअर कमिटीत खलबतं

Maharashtra BJP core committee meeting Devendra Fadnavis:बैठकीबद्दल भाजप नेत्यांनी मौन पाळले असले तरी तरी जिल्हावार पक्षाची कामगिरी कशी सुधारता येईल तसेच कोणत्या जागा लढणे? यश मिळवून देणारे ठरेल याबद्दल बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

मृणालिनी नानिवडेकर.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election). यावर्षी हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने आता निवडणूक आयोगाने महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांनी किती जागा लढवायच्या यांची आकडेमोड सुरु केली आहे.

भाजपच्या (BJP) कोअर समितीच्या बैठक नुकतीच झाली. यात जागावाटपावर खलबतं झाली. भारतीय जनता पक्षाने किमान १६० ते १७० जागा लढायल्या हव्यात असे स्पष्ट अनेक नेत्यांनी व्यक्त केले. गेल्या विधान सभा निवडणुकीत २०१९ च्या विधानसभेत भाजपने १६४ जागा लढविल्या होत्या. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत आहे.

भाजपचे राज्यातील 'चाणक्य'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी काल (शनिवारी) चार तास भाजपच्या कोअर समितीची बैठक झाली. विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी लवकरच प्राथमिक ब्लूप्रिंट तयार करण्यात येणार आहे. त्याचा आराखडाही निश्चित करण्याचे बैठकीत ठरले. फडणवीस यांच्यासह, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे पाटील आणि पंकजा मुंडे आदी बैठकीला उपस्थित होते.

बैठकीबद्दल भाजप नेत्यांनी मौन पाळले असले तरी जिल्हावार पक्षाची कामगिरी कशी सुधारता येईल तसेच कोणत्या जागा लढणे? यश मिळवून देणारे ठरेल याबद्दल बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

आमदार परत तर जाणार नाहीत ना?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यामुळे याबाबतही तातडीने पावले उचलावीत, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊनच विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर या गटातील काही आमदार परत तर जाणार नाहीत ना? याकडेही लक्ष दिले जात असून त्यातील जे आमदार नाराज आहेत किंवा परतण्याच्या मनःस्थितीत आहेत त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात येऊ नये ,अशी भूमिका घेण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT