Video Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, राष्ट्रवादीतील आमदाराच्या पुतण्यानं दुचाकीस्वाराला चिरडलं; युवकाचा जागीच मृत्यू

Mla Dilip Mohite Patil NePhew Car Accident : आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्यानं युवकाला चिरडलं. त्यानंतर आमदार पुतण्या कारमध्येच बसून होता.
mla dilip mohite patil nephew mayur mohite crushed 19 year old boy
mla dilip mohite patil nephew mayur mohite crushed 19 year old boy sarkarnama
Published on
Updated on

Pune Nashik Highway Accident : पुण्यातील पोर्श अपघातात बड्या बापाच्या अल्पवयीनं मुलानं दोन दुचाकीस्वारांना चिरडलं होतं. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. यातच आणखी एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीतील खेडेचे आमदार दिलीप मोहिते-पाटील ( Dilip Mohite Patil ) यांच्या पुतण्याकडून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आमदार मोहिते-पाटील यांच्या पुतण्यानं एका दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

mla dilip mohite patil nephew mayur mohite crushed 19 year old boy
Jogendra Katyare Dismiss: 'लेटरबॉम्ब' अंगलट; खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे बडतर्फ

पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे परिसरात हा अपघात झाला आहे. आमदारांचा पुतण्या मयूर मोहिते-पाटील याची फॉर्च्यूनर कार विरुद्ध दिशेनं जात होती. कारनं समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

mla dilip mohite patil nephew mayur mohite crushed 19 year old boy
Dilip Mohite On Jogendra Katyare: पुण्याचे कलेक्टर दिवसे-कट्यारेंमधल्या वादाला मोहितेंकडून राजकीय तडका; अधिकाऱ्यांत खमंग चर्चा

ओम भालेराव ( 19 वर्ष ) असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. अपघातानंतर मयूर मोहिते कारमध्येच बसून होता. अपघाताची माहिती मिळताच दुचाकीस्वाराच्या युवकाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात मयूर मोहिते-पाटलावर गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर मंच पोलिस ठाण्यात तणावपूर्ण परिस्थितीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com