Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shrinivas Vanga Video : 'शिंदेंनी घात केला उद्धव ठाकरे देव होते', बंडात सहभागी आमदार ढसाढसा रडला!

Shivsena Shinde News: एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली पालघरची जागा भाजपकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. येथून भाजपने राजेंद्र गावीत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Roshan More

Shrinivas Vanga : भाजपची चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली पालघरची जागा भाजपकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. येथून भाजपने राजेंद्र गावीत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथून शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांनी संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर श्रीनिवास वनगा यांन शिंदेना साथ दिली होती.

आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी हे आत्महत्येच्या विचारात असल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी आणि आईने केला आहे. या विषयी वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

तिकीट कापल्याने श्रीनिवास वनगा यांना रडू यांना कोसळले. मला चांगली संधी होती, मतदारसंघात मी काम केलं, विकासकामं केली.माझ्या वडिलांपासून मी केलेल्या प्रामाणिकपणाच फळ आम्हाला हेच मिळालं का? प्रत्येक वेळी गावितला मिळाले, असे म्हणत श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले.

श्रीनिवास वनगा हे 2019 मध्ये पालघर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नम यांचा पराभव केला आहे.

बंडात शिंदेना साथ

शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या नेत्यांमध्ये श्रीनिवास वनगा यांचा देखील समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT