Sanjay Raut News : महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, चार बैठका होऊनही जागा वाटपावर तोडगा निघू शकला नाही. जागा वाटपात लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण? यावरून शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेसमध्ये वाद होत आहे. निवडणुकीनंतर मोठा भाऊ कोण हे कळेल, असे म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसला इशाराच दिला होता. तर, मुख्यमंत्री काँग्रेसेचा होणार असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला होता.
जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी संजय राऊत दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
लोकसभेत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा काॅन्फिडन्स वाढला आहे. लोकसभेच्या आधी बॅकफूटवर गेलेली काँग्रेस फ्रंट फूटवर आली आहे. काँग्रेस नेत्यांकडून महाविकास आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा केला जातो आहे. मुख्यमंत्रिपद देखील काँग्रेसकडे राहिल असे सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या हा दावा शिवसेना (ठाकरे गट) खोडून काढतो आहे. शिवसेना जास्त जागा लढणार आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार,असे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. दोन्ही पक्षांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांमुळे जागा वाटपातील तिढा वाढला आहे.
राज्यात जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यानेच संजय राऊत काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा भेट घेत जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने 120 पेक्षा अधिक जागा लढण्याचा आग्रह धरला आहे. तर, शिवसेनेला (ठाकरे गट) देखील 100 पेक्षा अधिक जागा लढायचा आहेत.
शिवसेना 100, काँग्रेस 110 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 जागांवर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा फाॅर्म्युला आघाडीतील तीनही पक्षांनी मान्य केला तर आठ जागा आघाडीतील छोट्या पक्षांना देखील देण्यात येण्याची शक्यता आहे.
शिवेसना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून वाद होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलेही वक्तव्य न करण्याचे नसेच विजय आपला आहे या मानसिकतेमध्ये न राहता काम करण्याचा सल्ला पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.