Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

शिवतारेंच्या गद्दारीबद्दल चीड : `मातोश्री`वर जोरदार घोषणाबाजी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला होता. या बंडानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील अनेक भागातील शिवसैनिक त्यांची भेट घेत आहेत. त्यातच आज पुण्यातील शिवसैनिकांनी (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली. शिवतारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

'शिवसेना ठाकरेंची नाही कुणाच्या बापाची' अशा जोरदार घोषणा शिवसैनिकांनी 'मातोश्री'वर दिल्या. ज्यांना आपण दिले ते गेले आणि देणारे माझ्यासोबत राहिले. मी तुम्हाला आता काही देऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर शिवसेनेचे नेते एकच आहे आणि एकच राहणार ते म्हणजे उद्धव ठाकरे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना विश्वास दिला. जोमाने कामाला लागा कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी साद शिवसैनिकांनी ठाकरे यांना घातली. तसेच त्यांच्यासमोर विजय शिवतारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या वतीने राज्यातील जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांच्या बैठका घेतल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्या-जिल्ह्यातील सेनेचे कार्यकर्ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा त्यांना जाहीर करत आहेत. उद्धध ठाकरे हेही स्वत: या सर्व कार्यकर्त्यांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर माजी आमदार विजय शिवतारे यांनी तालुक्यातील विकास कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडावी, अशी मागणी केली होती. तसेच ५६ वर्षांची स्वाभिमानी शिवसेना संजय राऊत यांनी बारामतीच्या दावणीला लावली, अशी सडकून टीकाही त्यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT