सावकरांच्या वारसदारांचे शिंदे-फडणवीसांना स्मरण; विधान परिषद मिळण्याची शक्यता

राज्यापाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Ranjit Savarkar) यांचे वारस रणजित सवारकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
Ranjit Savarkar
Ranjit Savarkarsarkarnama

मुंबई : राज्यापाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Ranjit Savarkar) यांचे वारस रणजित सवारकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भाजपला (BJP) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्याची संधी मिळणार आहे. तसेच रणजित सावरकर यांना संधी देऊन भाजपचा आपले हिंदुत्व अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे.

संघ आणि दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील या नावाला सहमती देतील, अशी माहिती आहे. हिंदुत्वासाठी आपण भाजपसोबत सरकार स्थापन केल्याचा शिंदे यांचा दावा आहे. त्यामुळे रणजित सावरकर यांच्या नावाला त्यांची विरोध होण्याची शक्यता नाही.

Ranjit Savarkar
आणखी एक राजकीय भूकंप; नारायण मूर्तींच्या जावयासह चार मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

रणजित सावरकर हे व्यवसायाने इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले. आपद व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडिओ संपर्क व्हावा यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत त्यांचा मोलाच्या सहभाग होता.

Ranjit Savarkar
संजय राठोड शिंदे गट सोडायला तयार; 'मातोश्री'च बोलावणं आलं तर पुन्हा जाईल

रणजित सावरकर यांनी 'सावरकरस्मारक डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. त्यावर सावरकरांचे मराठी आणि इंग्रजी साहित्य निःशुल्क उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेले सावरकर साहित्य स्मारकाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com