Abu Azmi, Imtiaz Jaleel Sarkarnama
मुंबई

Aurangzeb Controversy : औरंगजेब महान होता; अबू आझमींचं 'ते' वक्तव्य भाजपच्या सांगण्यावरूनच; इम्तियाज जलील यांचा खळबळजनक दावा

Devendra Fadnavis Abu Azmi : "या लोकांनीच 400 वर्षांपूर्वी मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत केलं. औरंगजेबाला मागील 70 वर्षात कुणी वाचलं नसेल, तेवंढं मागील एका महिन्यात वाचलं असंही ते म्हणाले. तर यावेळी त्यांनी अबू आझमी यांनी केलेलं वक्तव्य मॅनेज होतं."

Jagdish Patil

Mumbai News, 22 Mar : औरंगजेब आणि त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण मागील अनेक दिवसांपासून तापलं आहे. अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाचं कौतुक केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद थेट विधानसभेत उमटल्यांचं पाहायला मिळालं.

मात्र, अबू आझमी यांनी जे वक्तव्य केलं ते भाजपच्याच (BJP) सांगण्यावरूनच केल्याचा गंभीर आरोप माजी खासदार आणि एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता, अनेक महत्त्वाचे प्रश्न होते. मात्र, लोक आम्हाला फार प्रश्न विचारतील. संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्यातील गुन्हेगारी, असे अनेक प्रश्न विचारतील.

त्याची आम्हाला उत्तरं देता येणार नाहीत. त्यामुळे औरंगजेबा संदर्भात वक्तव्य करा, असं भाजपने त्यांना सांगितलं होतं असा गावा इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना इम्तियाज जलील यांनी हे आरोप केले. तसंच औरंगजेबाचा मुद्दा आता काढण्याची गरज नाही.

या लोकांनीच 400 वर्षांपूर्वी मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत केलं. औरंगजेबाला मागील 70 वर्षात कुणी वाचलं नसेल, तेवंढं मागील एका महिन्यात वाचलं असंही ते म्हणाले. तर यावेळी त्यांनी अबू आझमी यांनी केलेलं वक्तव्य मॅनेज होतं, असंही म्हटलं. ते म्हणाले, "विधानसभेला देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सांगण्यावरूनच अबू आझमींनी राज्यभरात विविध ठिकाणी उमेदवार उभे केले.

कारण त्यांची उत्तर प्रदेशात खूप संपत्ती आहे, त्यांचे तिकडे कनेक्शन्स आहेत. त्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून त्यांनी माझ्या विरोधातही उमेदवार उभा केला होता. त्यांच्या उमेदवाराला पाच हजार मतं मिळाली आणि मी दोन हजार मतांनी पराभूत झालो. शिवाय अधिवेशनाचा पहिला दिवस होता.

अनेक महत्त्वाचे प्रश्न होते. त्यांच्या मतदारसंघातही गोवंडीत मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय चालतो. आझमी यांचे लोकच तो चालवतात. मात्र, तो संपवण्यासाठी सभागृहात चर्चा न करता. हे औरंगजेब महान होता असं म्हणतात, त्यांनी असं वक्तव्य करण्याची काय गरज होती? मात्र, त्यांना अस बोलण्यासाठी भाजपने भाग पाडलं."

अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

अबू आझमी म्हणाले, "औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती. देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जातेय. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. तो क्रूर प्रशासक नव्हता. शिवाय काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लिम अशी नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यातील लढाई ही राजकीय होती. "

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT