
Mumbai News : गेल्या काही दिवसापासून राज्यात राहणाऱ्या मुस्लिम समाजाविरोधात गरळ ओकली जातेय. यात भाजपचे काही नेते आणि सरकारमधील एका मंत्र्याचा समावेश आहे. यातच नागपुरात इतिहासात पहिल्यांच दंगल घडली. यावरून देखील मुस्लिम समाजाला लक्ष केलं जातयं. सध्याच्या अशा बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजाला धीर देत, "तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे, मुस्लिमांना जो डोळे दाखवणार त्याला सोडणार नाही" असा गर्भित इशारा दिला आहे. ते मरिन लाइन्स येथे आयोजित इफ्तार पार्टीत बोलत होते. यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.21) मुंबईमधील इफ्तार पार्टीला हजेरी लावत मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्य केली जातायत. यावरून अजित पवार यांनी सूचक वक्तव्य करताना, समाजाला आपण सोबत असल्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी अजित पवार यांनी, " रमजान महिना पवित्र असून समाजातील लोक रोज रोजे ठेवतात, असे म्हणत पवित्र रमजान महिन्याच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. या पवित्र महिन्यात तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि आनंद घेऊन येवो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो, अशाही शुभेच्छा दिल्या आहेत. तर रमजान आणि मुस्लिम बांधव समाजात एकता बंधुत्व निर्माण करतात. रमजान केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून तो एकता बंधुत्वाचा संदेश देण्याबरोबरच गरजूंची पीडा समजण्याची प्रेरणा देतो, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच अजित पवार यांनी यावेळी, "भारत विविधतेमध्ये एकतेच प्रतीक असून छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांनी जातींना एकत्र केलं. त्यांनी समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्याला देखील शिव, शाहू, आंबेडकर, फुलेंचा वारसा पुढे न्यायचा आहे. समाज विभाजन करणाऱ्या शक्तींच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपली ऐकतेची ताकद दाखवून द्या. कोणी कितीही बोलो. पण तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत आहे. हे लक्षात घ्या, असेही त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी यावेळी एक सूचक करताना, मुस्लिम बांधवांना जो पण डोळे दाखवणार, त्याला सोडणार नाही, असेही म्हटलं आहे. तर दोन गटात भांडण लावून कायदा व्यवस्था बिघडवणार आणि कायदा आपल्या हातात घ्यायची गोष्ट करणार असेल तर त्याला सोडणार नाही. मग तो कोणीही असला तरीही सोडलं जाणार नाही. माफ केलं जाणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.
रमजान निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर या इफ्तार पार्टीचे काही फोटो स्वत: आपल्या अधिकृत एक्सवर शेअर केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.